घरमुंबईबारामती हवीशी वाटत असल्यास भाजप लॉन्ड्रीचं स्वागतच...,खासदार सुळेंची भाजपच्या बावनकुळेंवर टीका

बारामती हवीशी वाटत असल्यास भाजप लॉन्ड्रीचं स्वागतच…,खासदार सुळेंची भाजपच्या बावनकुळेंवर टीका

Subscribe

मुंबई – भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर बारामतीचा विषय निघाल्यानंतर आता सुप्रिया सुळे रोज 25 गावांना भेटी देत आहेत, अशी टीका केली होती. याला सुप्रिया सुळें यांनी उत्तर दिले आहे. यावेळी बारामती हवीशी वाटत असेल तर भाजप लॉन्ड्रीचे स्वागतच असल्याचे त्यांनी म्हटले आहे. एवढचे नव्हे तर तुम्ही माझ्या सोबत चला मी तुम्हाला मतदारसंघातील प्रत्येक तालुका दाखवते, तसेच निवडणुकीत किती खर्च झाला याची देखील ऑनलाईन माहिती उपलब्ध आहे.

सुप्रीया सुळे काय म्हणाल्या –

- Advertisement -

बारामती हवीशी वाटत असेल तर भाजप लॉन्ड्रीचे स्वागतच असल्याचे त्यांनी म्हटले आहे. पुढे बोलताना त्या म्हणाल्या की, माझ्या सोबत चला मी तुम्हाला मतदारसंघातील प्रत्येक तालुका दाखवते, तसेच निवडणुकीत किती खर्च झाला याची देखील ऑनलाईन माहिती उपलब्ध आहे. प्रत्येकाला चांगल्या कॉलेजमध्ये प्रवेश घ्यायचा असतो, पण तो प्रत्येकाला मिळत नाही. जर भाजपाला बारामती हवी असेल तर याचा अर्थ आम्ही पास झालो असा होतो, असा टोला सुप्रिया सुळे यांनी लगावला आहे.

बावनकुळेंचा दावा काय होता? –

- Advertisement -

बावनकुळे यांनी असा दावा केला आहे की, आम्ही येत्या लोकसभा निवडणुकीमध्ये 45 जागा जिंकू, त्यामध्ये बारामती पहिल्या स्थानावर असेल. एवढचं नव्हे तर पुढे बावनकुळे यांनी असंही म्हटलं आहे की,  बारामतीचा विषय निघाल्यानंतर आता सुप्रिया सुळे रोज 25 गावांना भेटी देत आहेत, अशी टीका बावनकुळेंनी केली आहे.

Ajinkya Desai
Ajinkya Desaihttps://www.mymahanagar.com/author/ajinkyadesai/
मागील 4 वर्षापासून डिजिटल मिडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -