घरमुंबईMPSC Exam 2020 : MPSC च्या विद्यार्थ्यांना लोकल प्रवासाची मुभा, राज्य सरकारचा...

MPSC Exam 2020 : MPSC च्या विद्यार्थ्यांना लोकल प्रवासाची मुभा, राज्य सरकारचा आदेश

Subscribe

एमपीएससीची संयुक्त पूर्वपरीक्षा उद्यापासून म्हणजे ४ सप्टेंबरपासून सुरु होतेय. या परीक्षेसाठी उमेदवाराला परीक्षा केंद्रापर्यंत वेळेवर पोहचण्यासाठी अडचणी येऊ नये यासाठी त्यांना लोकल प्रवासाची मुभा देण्यात आली आहे. राज्य़ सरकारने यासंदर्भात नवा आदेश जाहीर केला आहे. त्यानुसार परीक्षेसाठी उमेदवाराला लोकलमधून प्रवास करण्यासाठी परीक्षेचं ओळखपत्र दाखवावे लागणार आहे.

एमपीएससीच्या संयुक्त पूर्वपरीक्षेला उद्यापासून सुरुवात होतेय. मात्र गेल्या अनेक दिवसांपासून विद्यार्थी या परीक्षेच्या प्रतिक्षेत होते. पण मुंबई कोरोनाचा वाढत संसर्ग लक्षात घेता प्रवासावर निर्बंध लादण्याच आले. यात मुंबई लोकलमधून प्रवास करण्यासाठी प्रवाशाला लसींचे दोन डोस घेणं अनिवार्य करण्यात आले. ज्यांचे लसीचे दोन डोस घेऊन १५ दिवस उलटून गेले त्यांनाच मुंबई लोकल पास दिला जातो. अशा परिस्थितीत एमपीएससीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर पोहचण्यासाठी अडचणी येऊ नयेत म्हणून राज्य सरकाराने रेल्वे प्रशासनाला पत्र लिहिले. या पत्रात एमपीएससीच्या विद्यार्थ्यांना लोकल प्रवासाची मुभा द्यावी अशी मागणी राज्य सरकारने रेल्वे प्रशासनाकडे केली होती. ही मागणी रेल्वे प्रशासनाने मान्य करत विद्यार्थ्यांना लोक प्रवासाची मुभा दिली.

- Advertisement -

यामुळे महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब संयुक्त पूर्वपरीक्षा २०२० साठी विद्यार्थी लोकल प्रवास करु शकणार आहेत. मात्र विद्यार्थ्यांना एमपीएससी परीक्षेचं ओळखपत्र सोबत ठेवणे अनिवार्य असेल. कारण ओळखपत्र दाखवल्यानंतरचं विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी लोकल प्रवास करत येईल. कोरोनाच्या वाढत्या प्रार्दुभावामुळे राज्य सरकारने ११ एप्रिल २०२१ रोजी महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब साठीची परीक्षा पुढे ढकलली. त्यानंतर नवे परिपत्रक जाहीर करत परीक्षा ४ सप्टेंबर २०२१ रोजी घेण्याचा निर्णय महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने घेतला आहे.


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -