एमपीएससीची ऑनलाईन अर्ज प्रक्रिया स्थगित

ऑनलाईन अर्ज प्रक्रियेला स्थगिती देण्यात आल्याचा निर्णय एमपीएससीकडून ट्विटरद्वारे जाहीर करण्यात आला आहे.

MPSC

सरकारी नोकरीसाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून राबवण्यात येणार्‍या भरती प्रक्रियेसाठी ऑनलाईन अर्ज करण्यात येते. मात्र एमपीएससीच्या संकेतस्थळामध्ये काही तांत्रिक अडचणी आल्याने ही प्रक्रिया काही काळासाठी स्थगित करण्याचा निर्णय एमपीएससीकडून घेण्यात आला आहे. त्यामुळे यापुढे होणार्‍या सर्व परीक्षांचे अर्ज भरण्यास स्थगिती देण्यात आली आहे.

विविध सरकारी कार्यालयातील नोकर भरतीसाठी एमपीएससीकडून परीक्षा घेण्यात येते. या परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज करावे लागते. मात्र ऑनलाईन अर्ज प्रक्रियेला स्थगिती देण्यात आल्याचा निर्णय एमपीएससीकडून ट्विटरद्वारे जाहीर करण्यात आला आहे. तांत्रिक अडचणीमुळे ऑनलाईन अर्ज प्रक्रिया स्थगित केली असून, अडचण दूर झाल्यानंतर पुन्हा सूचना देण्यात येईल, तसेच सर्व जाहिरातींना अनुसरून अर्ज करण्यास पुरेशी मुदतवाढ देण्यात येईल, असे एमपीएससीने अधिकृत ट्विटरद्वारे जाहीर केले आहे.