घरमुंबईMr. R. M. Bhatt : रोहन धुरीने पटकविला 'आर. एम. भट श्री' किताब

Mr. R. M. Bhatt : रोहन धुरीने पटकविला ‘आर. एम. भट श्री’ किताब

Subscribe

रोहन धुरीला विजेता म्हणून 21 हजार रोख, आकर्षक चषक देऊन गौरविण्यात आले.

मुंबई : यंदाची ‘आर.एम.भट श्री’ शरीरसौष्ठव ही स्पर्धा परळ, लालबाग, काळाचौकी, नायगाव विभागातील खेळाडूंसाठी खुली करण्यात आली होती. या स्पर्धेत विविध वजनी गटात खेळल्या गेलेल्या या स्पर्धेत रोहन धुरी यांने ‘आर. एम. भट श्री’ हा किताब पठकविला आहे. रोहन धुरीला विजेता म्हणून 21 हजार रोख, आकर्षक चषक देऊन गौरविण्यात आले. रोहन धुरीला कडवी झुंज देणारा संजय जाधव उपविजेता ठरला, तर मेन्स फिजिक्समध्ये प्रतिक साळवी याने विजेतेपद पटकावले.

या स्पर्धेत रोहन धुरीला प्रणव खातू याने प्रणव खातू याने जबरदस्त टक्कर दिली. पण अखेर रोहन धुरी हा उजवा ठरला. प्रणव खातूला यावेळचा बेस्ट इम्प्रुव्हमेंट शरीरसौष्ठव म्हणून गौरविण्यात आले. संजय जाधव या स्पर्धेत उपविजेता ठरला तर ‘राम जी की निकली सवारी’ या गाण्यावर अफलातून पोझिंग करत उपस्थितांची मने जिंकणारा ओमकार साईम हा बेस्ट पोझरचा मानकरी ठरला. गटविजेत्यांसह सर्व स्पर्धकांना आकर्षक पारितोषिके देऊन सन्मानित करण्यात आले.

- Advertisement -

हेही वाचा – Aaditya Thackeray : महाराष्ट्रातील गँगवॉरचे मुख्यमंत्री लीडर, आदित्य ठाकरेंचा आरोप

राष्ट्रीय शरीरसौष्ठवपटू संदीप जाधव, जालिंदर आपके, प्रविण गणवीर, अमर भंडारी यांनी स्पर्धेला उपस्थित राहून खेळाडूंना प्रोत्साहन दिले. यावेळी माजी ‘आरएम भट श्री’ विजेते खेळाडू देखील उपस्थित होते. तर भाई आंबोले, विक्रांत देसाई, काशिनाथ जाधव, विष्णु घाग, भुषण पाटकर, अभिषेक फुटाणे, हेमल राणा, सुशांत चौगुले, अभिषेक मानकर आदींनी स्पर्धा यशस्वी करण्यासाठी विशेष प्रयत्न केले. प्रशांत खामकर यांनी स्पर्धेचे सूत्रसंचालन केले.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -