घरताज्या घडामोडीMukesh Ambani Bomb Scare: टेलिग्राम मेसेजचे तिहार कनेक्शन उघड, स्कॉर्पिओचा फॉरेन्सिक अहवाल...

Mukesh Ambani Bomb Scare: टेलिग्राम मेसेजचे तिहार कनेक्शन उघड, स्कॉर्पिओचा फॉरेन्सिक अहवाल समोर

Subscribe

प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेल्या स्कॉर्पिओ प्रकरणातील तिहार कनेक्शन समोर आले आहे. यादरम्यान याप्रकरणातील गाडीचा फॉरेन्सिक अहवाल देखील समोर आला आहे. याबाबत मराठी वृत्तवाहिनी एबीपी माझाने अहवाल प्रसारित केला आहे. या अहवालामध्ये स्कॉर्पिओ गाडीचा चेचिस नंबर आणि इंजिन नंबर कसा मिटवण्यात आला?, असा खुलासा झाला आहे.

दरम्यान अंबानींना धमकी देणार पत्र तिहार जेल परिसरातूनच आल्याचे सायबर अहवालात उघड झाले आहे. हे पत्र पाठवण्यासाठी एअरटेल सिमकार्डच्या नंबरचा वापर करण्यात आला होता, असेही अहवालात नमूद करण्यात आले. अहवालात नमूद केल्याप्रमाणे तपास यंत्रणेला आयपी अड्रेस ट्रेस केल्यानंतर एक नंबरही मिळालाय ज्याचा आता शोध घेतला जात आहे. ‘जैश उल हिंद’ हे टेलिग्राम चॅनेल उघडण्यासाठी याच एअरटेल इंटरनेटचा वापर करण्यात आला होता. तर प्रॉक्सीच्या माध्यमातून वेगवेगळे नंबर दाखवण्यासाठी विशिष्ट Appचा वापर केला जात होता, असेही अहवालात समोर आले आहे. या सगळ्यांमध्ये डार्कवेबचा वापर झाल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.

- Advertisement -

२५ फेब्रुवारीला जेव्हा अंबानींच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ आढळली, तेव्हा मुंबई क्राईम ब्रांचने गाडी जप्त केली होती. त्यानंतर फॉरेन्सिक टीमला बोलावले होते. या गाडीचे येलो गेट पोलीस स्टेशन मागील जागेत ऑडिट करण्यात आले होते. याचे अहवाल माध्यमांसमोर आले आहेत. या अहवालामधून महत्त्वाची माहिती समोर आली आहे. या गाडीची कोणत्याही प्रकारची छेडछाड किंवा बदल करण्यात आली नाही आहे. १७ फेब्रुवारीला विक्रोळीत ईस्टन एक्स्प्रेस हायवेला रोडवर पार्क केली होती. त्यानंतर स्कॉर्पिओला ज्यांनी कोणी चोरी केली होती, त्यांनी कोणत्याही प्रकारची तोडफोड केली नाही. तसेच फोर्स वापरला नाही. खूप सोप्यापद्धतीने चोरी केली होती, असे समोर समोर आले आहे.


हेही वाचा – सचिन वाझे लादेन नाहीत, दोषींवर कारवाई करणारच

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -