घरमुंबईमुकेश अंबानींनी पत्नी नीता यांना दिली खास दिवाळी भेट; गिफ्ट पाहून तुम्हालाही बसेल धक्का

मुकेश अंबानींनी पत्नी नीता यांना दिली खास दिवाळी भेट; गिफ्ट पाहून तुम्हालाही बसेल धक्का

Subscribe

मुंबई : दिवाळीला भेटवस्तू देण्याची परंपरा आहे. सर्व जण आपल्या कुटुंबातील सदस्य आणि नातेवाईकांना लोकांना भेटवस्तू देतो. यात आपण आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी यांनी पत्नी नीता अंबानीला दिवाळी निमित्ताने आलिशान कार भेट दिली आहे. नीता अंबानी लग्झरी लाईफस्टाईलसाठी चर्चेत असतात. नीता अंबानी आज कोट्यावधी संपत्तीच्या मालकीन आहेत.

मुकेश अंबानीने पत्नी नीता अंबानीला रोल्स रॉयस कलिनन ब्लॅक बॅज ही सर्वात महागडी कार भेट दिली आहे. ही कार भारतातील सर्वात महागड्या गाड्यांपैकी एक आहे. या गाडीची किमत सुमारे 10 कोटी रुपये असल्याची माहिती माध्यमातून मिळाली आहे. या आलिशान एसयूव्हीचा व्हिडिओही सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

- Advertisement -

हेही वाचा – मुंब्र्यातून उद्धव ठाकरेंचा ताफा माघारी; शाखा स्थळी जाण्यास पोलिसांनी रोखलं!

अंबानी कुटुंबात 150 हून अधिक आलिशान कार आहेत. मुकेश अंबानी पत्नी नीता अंबानी यांना भेटवस्तू देत असतात. पण यंदाच्या दिवाळीत मुकेश अंबानी यांनी नीताला रोल्स रॉयस कलिनन ब्लॅक बॅज भेट दिला आहे. बॉलीवूड अभिनेता शाहरुख खानकडेही रोल्स रॉयस कलिनन एसयूव्ही आहे. आता नीता अंबानी यांच्याकडे ही कार असणार आहे.

- Advertisement -

हेही वाचा – मुंब्य्रात ठाकरे-शिंदे गट आमनेसामने; 500 पोलीस, आरपीएफसह दंगल नियंत्रण पथक तैनात

आलिशान एसयूव्ही कारची माहिती

मीडिया रिपोर्ट्सनुसार, रोल्स रॉयस कुलीनन एका खास रंगात तयार करण्यात आली आहे. जो सुरक्षेच्या कारणास्तवही खास आहे. Rolls Royce Cullinan Black Badge मध्ये 6.75 लिटर ट्विन टर्बो चार्ज केलेले B12 इंजिन वापरण्यात आले आहे. मुंबईच्या रस्त्यांवर ही कार कडेकोट बंदोबस्तात दिसणार आहे. या आलिशान एसयूव्ही कारचे व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

हेही वाचा – दिवाळीत गावी जाताय, सावधान : सूरत रेल्वे स्थानकावर चेंगराचेंगरी; एकाचा मृत्यू

अंबानीकडे ‘या’ कार आहेत

नीता अंबानी यांच्याकडे BMW, Audi, Volvo, Ferrari, Porsche, Toyota, Bentley, Mercedes यासह अनेक कंपन्यांच्या आलिशान कार आहेत, त्यांची संख्या 150 पेक्षा जास्त आहे. नुकतेच मुकेश अंबानी यांनी भारतातील सर्वात मोठ्या स्वदेशी स्टोअरचे उद्घाटन केले होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -