स्कॉर्पिओच्या मालकाचा मृतदेह सापडला मुंब्रा रेती बंदरच्या खाडीत

mukesh ambani house explosive loaded scorpio case car owner mansukh hiren found death body at mumbra retibandar
स्कॉर्पियोच्या मालकाचा मृतदेह सापडला मुंब्रा रेती बंदरच्या खाडीत

प्रख्यात उद्योजक देशातील नंबर १चे श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी यांच्या दक्षिण मुंबईतील अँटालिया या अलिशान बंगल्याजवळ सापडलेल्या स्कॉर्पिओ गाडीचा मालक मनसुख हिरेन याचा मृतदेह मुंब्रा रेती बंदर येथे शुक्रवारी दुपारी सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. २५ फेब्रुवारीच्या रात्री १ स्कॉर्पिओ अंबानीच्या घराखाली गाडी सापडली होती. या गाडीमध्ये जिलेटीनच्या १७ कांड्या आणि मुकेश अंबानीला परिवारासह धमकीचे पत्र सापडले होते.

दरम्यान शुक्रवारी विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी स्कॉर्पिओचे मालक आणि सीआययूच्या युनिटचे सचिन वझे यांचा संबंध काय या सर्व प्रकरणाची एनआयए चौकशी झाली पाहिजे अशी मागणी केली होती. मुकेश अंबानी यांच्या घरासमोर एक गाडी सापडली. हा घटनाक्रम संशय निर्माण करणारा आहे. वाहन सापडल्यावर टेलीग्रामवर एक ग्रुप तयार झाला आणि त्यावर एक पत्र आले, ‘जैश उल हिंद‘ नावाने. एक क्रिप्टो करंसी अकाऊंट दिलं होतं. पण तसं कुठलं खातंच नव्हतं. या ठिकाणी एक नाही तर दोन गाड्या पोहोचल्या होत्या. गाडी ओळखल्याबरोबर सचिन वझे पहिल्यांदा पोहोचले. तीन दिवसांपूर्वी तपासातून सचिन वझे यांना काढले. ज्यांची गाडी चोरीला गेली, त्याच्याशी एका क्रमांकावर अनेक वेळा संवाद झाल्याचे समोर आले. वझे ठाण्यातील, गाड्या ठाण्यातील आणि या दोघांचा आधीपासून संवाद होता. शंकेला वाव देणारे बरेच पुरावे आहेत. त्यामुळे या प्रकरणाची संपूर्ण चौकशी NIA ला द्यावी, अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात केली.

जैश उल हिंद या अतिरेकी संघटनेने या संपूर्ण प्रकरणाची जबाबदारी झटकल्याने एकूणच संशय बळावला होता. आता तर स्कॉर्पिओचा मालक मनसुख हिरेन याचा मृतदेह मुंब्रा रेती बंदर येथे सापडल्याने हे सर्व प्रकरण आता गंभीर वळणावर पोहचले आहे. गेल्याच आठवड्यात हिरेन यांनी स्वतः पोलिसांसमोर हजर राहत आपली गाडी हरवली असल्याची तक्रार पोलीस स्थानकात दाखल केली होती. दरम्यान शुक्रवारी दुपारी हिरेन यांच्या कुटूंबीयांनी ते बेपत्ता झाल्याची तक्रार नौपाडा पोलीस स्थानकात नोंदवली होती. मात्र काही तासांअगोदरच मनसुख हिरेन याचा मृतदेह रेती बंदर येथील खाडीत सापडला आहे. त्यामुळे आता या प्रकरणाला वेगळे वळण आले आहे.

स्कॉर्पिओ गाडीचा मालक मनसुखे हिरेन मुंबई पोलिसांसमोर हजर

अंबानींच्या घराबाहेर स्फोटकांसह आढळलेल्या स्कॉर्पिओ गाडीचा मालक मनसुखे हिरेन मुंबई पोलिसांसमोर हजर

Posted by आपलं महानगर – My Mahanagar on Friday, February 26, 2021