घरमुंबईमाहिमच्या नाकाबंदीत तीन कोटीचे विदेशी चलन जप्त

माहिमच्या नाकाबंदीत तीन कोटीचे विदेशी चलन जप्त

Subscribe

मुंबईतील माहीम येथे नाकाबंदीच्या दरम्यान पावणे तीन कोटी रुपयांचे विदेशी चलन आढळून आले आहे. याप्रकरणी दोन जणांना माहीम पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर पोलीस प्रशासन सतर्क झाले असून ठिकठिकाणी सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली असून पोलिसांची करडी नजर आहे. अशातच निवडणूक आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून वाहनांची कसून तपासणी करण्यात येत असताना माहीम येथे नाकाबंदी दरम्यान विदेशी चलन जप्त करण्यात आले आहे. माहीम पोलिसांनी पावणे तीन कोटी रुपयांचे विदेशी चलनासह दोन जणांना ताब्यात घेतले आहे. ताब्यात घेण्यात आलेले विदेशी चलन हे विमानाने कोलकत्ता येथे जाणार होते, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. याबाबत अद्याप कुठल्याही प्रकारचा गुन्हा दाखल करण्यात आलेला नसून याप्रकरणी आयकर विभागाला कळवण्यात आलेले आहे.

अशी करण्यात आली नाकाबंदी

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माहीम पोलिसांकडून बुधवारी रात्री माहीम चर्च या ठिकाणी नाकाबंदी लावण्यात आली. या दरम्यान पोलिसांनी दादरच्या दिशेने जाणाऱ्या एका टॅक्सीला थांबवले. या टॅक्सीत बसलेल्या दोन प्रवाशांकडे चौकशी करण्यात आली, तसेच त्यांच्याजवळ असलेल्या बॅग तपासल्या असता त्यात मोठ्या प्रमाणात विदेशी चलन मिळून आले. पोलिसांनी दोघांना ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणून चौकशी केली असता दोन कोटी ८० लाख रुपयांची विदेशी चलन असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. हे चलन विमानाने कलकत्ता येथे पाठ्वण्यात येणार होते. मात्र, विमान सुटल्यामुळे या चलनाचे कुरिअर पाठवता आले नाही आणि ते नोटांचे पार्सल पुन्हा विमानतळावरून दादर येथील कार्यालयात आणण्यात येत होते, अशी माहिती चौकशीत पुढे आली आहे. माहीम पोलिसांनी गुन्हा दाखल न करता पोलीस ठाण्यातील दैनंदिनीत त्याची नोंद करून निवडणूक अधिकारी, आयकर विभाग याना सूचना देण्यात आलेली आहे. आयकर विभाग आणि निडणूक अधिकारी या प्रकरणाचा तपास करीत आहे.

- Advertisement -

वाचा – कल्याणमधून ३ लाखांची रोकड जप्त

वाचा – मुंबईतल्या शिवाजीनगरमधून लाखोंचा दारुसाठा जप्त

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -