घरगणपती उत्सव बातम्यागणपती विसर्जन: मुंबईच्या ५३ रस्त्यांवर No Entry!

गणपती विसर्जन: मुंबईच्या ५३ रस्त्यांवर No Entry!

Subscribe

विसर्जनाच्या दिवशी शहरातील ५३ रस्त्यांवरील वाहतूक पूर्णपणे बंद केली जाणार असून ९९ मार्गांवर 'नो पार्किंग' लागू करण्यात येणार आहे.

गणपती बाप्पाच्या विसर्जनला आता अवघे काही तास उरले आहेत. उद्या (रविवारी) गणपती बाप्पाचे विसर्जन होणार असल्यामुळे सध्या सगळीकडे विसर्जन मिरवणुकीची तयारी सुरु आहे. सर्वचजण आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देण्याचा तयारीला लागले आहेत. तर दुसरीकडे मुंबई महापालिकेसह वाहतूक पोलिसांनीही विसर्जनासाठी कंबर कसली आहे. पालिका आणि मुंबई वाहतूक पोलिसांकडून उद्याच्या बंदोबस्तामध्ये विशेष वाढ करण्यात आली आहे. विसर्जन मिरवणुकांमध्ये कोणत्याही प्रकारची वाहतुकीची समस्या निर्माण होऊ नये यासाठी दरवर्षीप्रमाणेच यंदाही वाहतूक व्यवस्थेत आवश्यक ते बदल करण्यात आले आहेत. या बदलांनुसार शहरातील ५३ रस्त्यांवरील वाहतूक पूर्णपणे बंद केली जाणार असून ९९ मार्गांवर ‘नो पार्किंग’ लागू करण्यात येणार आहे. हे नियम रविवार (२३ सप्टेंबर) दुपारी १२ पासून ते सोमवार (२४ सप्टेंबर) सकाळी ६ पर्यंत लागू करण्यात आले आहेत.


वाचा : धक्कादायक! बाप्पाच्या गळ्यातून चोरला नोटांचा हार

याशिवाय मुंबईतील गिरगाव, जुहू, दादर तसंच वर्सोवा या मुख्य चौपाट्यांवरही सुरक्षेचा कडक बंदोबस्त करण्यात आला आहे. गणेश भक्तांची कोणतीही गैरसोय होऊ नये शिवाय विसर्जनाच्या ठिकाणी कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी चौपाट्यांवर मुंबई शहर वाहतूक पोलिंसाकडून खास नियंत्रण कक्षांची उभारणी करण्यात आली आहे. उपलब्ध माहितीनुसार, विसर्जन मिरवणुकांदरम्यान वाहतुकीच्या व्यवस्थापनासाठी ३ हजार १६१ पोलीस अधिकारी आणि १ हजार ५७० वाहतूक मदतनीस सज्ज असणार आहेत. याशिवाय स्काऊट गाईड, NSS, वॉटर सेफ्टी पेट्रोल आणि नागरी संरक्षण दल आदी संस्थांचे कार्यकर्तेही या कार्यात त्यांना हातभार लावतील.


वाचा : देश का चौकीदार चोर है : राहुल गांधी

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -