पश्चिम रेल्वेवर एसी लोकलच्या ८ फेऱ्या वाढणार

पश्चिम रेल्वेने वातानुकूलित लोकलच्या आठ अतिरिक्त फेऱ्या सुरु करण्याचा निर्णय घेतला असून जानेवारी अखेरपर्यंत या फेऱ्या सुरु होणार आहेत.

mumbai ac local service increases eight rounds on western railway

प्रथम दर्जापेक्षा अधिक भाडे देऊन प्रवास सुखकर होण्यासाठी अनेक प्रवासी एसी लोकलने प्रवास करतात. अशा प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी आहे. आता लवकरच पश्चिम रेल्वेवर ८ फेऱ्या वाढणार आहेत. त्यामुळे प्रवाशांना दिलासा मिळणार आहे. पश्चिम रेल्वेने वातानुकूलित लोकलच्या आठ अतिरिक्त फेऱ्या सुरु करण्याचा निर्णय घेतला असून जानेवारी अखेरपर्यंत या फेऱ्या सुरु होणार आहेत.

गर्दीच्या वेळी प्रत्येकी एक फेरी चालवण्यात येईल

वातानुकूलित लोकलफेऱ्यांबाबत पश्चिम रेल्वेने तयार केलेल्या प्राथमिक आहवालानुसार, आठपैकी सकाळी आणि सायंकाळी त्यासोबतच गर्दीच्या वेळी प्रत्येकी एक फेरी चालवण्यात येईल. तर उर्वरित सहा फेऱ्या दुपारच्या वेळेत चालवण्यात येणार आहेत. पुढच्या दोन आठवड्यांमध्ये अतिरिक्त वातानुकूलित फेऱ्यांचा प्रस्ताव मंजुरीसाठी पाठवण्यात येईल. चर्चगेट ते विरार दरम्यान या फेऱ्या चावण्यात येतील, असे पश्चिम रेल्वेचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक जी. व्ही. एल. सत्यकुमार यांनी सांगितले आहे आहे.

या स्थानका दरम्यान चालवण्यात येणार लोकल

सुरुवातीला चर्चगेट ते वांद्रेदरम्यान या अतिरिक्त फेऱ्या चालवण्याचा प्रस्ताव विभागीय कार्यालयाने तयार केला होता. मात्र, तांत्रिक कारणास्तव तो रखडला गेला होता. सद्यस्थितीत पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात चार वातानुकूलित लोकल आहेत. यापैकी एका लोकलची देखभाल – दुरुस्ती सुरु असून अन्य दोन लोकलच्या चाचण्या सुरु आहेत. उर्वरित एक लोकल पश्चिम रेल्वेवर धावत आहेत. मेट्रो, रेल्वे यांची जोडणी असल्यामुळे अंधेरी स्थानक पश्चिम रेल्वेवरील वर्दळीचे स्थानक ठरले आहे. पश्चिम रेल्वेच्या आकड्यांनुसार अंधेरी स्थानकातील प्रवासी संख्येत वाढ होत आहे. यामुळे चर्चगेट ते विरार मार्गापेक्षा अंधेरी – विरार मार्गावर लोकलफेऱ्या सुरु करणे अधिक सोईचे होईल, अशी मागणी प्रवाशांमधून व्यक्त होत आहे.


हेही वाचा – रेल्वे परिसरात पतंग उडविणार्‍यांवर असणार नजर