Eco friendly bappa Competition
घर मुंबई मुंबईतील हवा प्रदूषण आणि धूळ नियंत्रणात आणणार; डॉ.संजीव कुमार यांची ग्वाही

मुंबईतील हवा प्रदूषण आणि धूळ नियंत्रणात आणणार; डॉ.संजीव कुमार यांची ग्वाही

Subscribe

मुंबई महापालिका क्षेत्रात मागील काही दिवसांपासून हवामान विषयक कारणांमुळे तसेच सर्वत्र सुरू असलेल्या विविध विकास कामांमधून निर्माण होत असलेल्या धुळीमुळे हवेचा गुणवत्ता स्तर खालावला आहे. त्यावर नियंत्रण आणण्यासाठी महापालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. इकबाल चहल यांच्या आदेशानुसार, अतिरिक्त आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ संजीव कुमार यांच्या अध्यक्षतेखाली एकूण सात सदस्यांची समिती गठीत करण्यात आली आहे. या समितीने सात दिवसात अहवाल सादर करण्याचे आदेश आयुक्तांनी दिले आहेत.

मुंबई:मुंबईच्या हवेतील धूळ व प्रदूषण यावर नियंत्रण आणण्यासाठी आवश्यक कार्यवाही वेगाने राबविण्यात येणार आहे, अशी माहिती अतिरिक्त आयुक्त डॉ.संजीव कुमार यांनी मंगळवारी दिली.

मुंबई महापालिका क्षेत्रात मागील काही दिवसांपासून हवामान विषयक कारणांमुळे तसेच सर्वत्र सुरू असलेल्या विविध विकास कामांमुळे हवेचा गुणवत्ता स्तर खालावला आहे. त्यावर नियंत्रण आणण्यासाठी महापालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. इकबाल चहल यांच्या आदेशानुसार, अतिरिक्त आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ संजीव कुमार यांच्या अध्यक्षतेखाली एकूण सात सदस्यांची समिती गठीत करण्यात आली आहे. या समितीने सात दिवसात अहवाल सादर करण्याचे आदेश आयुक्तांनी दिले आहेत.

- Advertisement -

या समितीची महत्वाची बैठक समिती अध्यक्ष डॉ संजीव कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली मंगळवारी पालिका मुख्यालयात पार पडली. या बैठकीला, हवा प्रदूषण व धूळ नियंत्रण समितीचे सदस्य सचिव उपायुक्त (पर्यावरण) अतुल पाटील, उपायुक्त (पायाभूत सुविधा) उल्हास महाले, उपायुक्त (घनकचरा व्यवस्थापन) चंदा जाधव, प्रमुख अभियंता (रस्ते) यांचे प्रतिनिधी मनीष पटेल, प्रमुख अभियंता (विकास नियोजन) सुनील राठोड, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रतिनिधी कार्तिक लंगोटे आणि महापालिका आयुक्त कार्यालयाचे प्रतिनिधी कार्यकारी अभियंता सतीश गीते त्याचप्रमाणे तांत्रिक सल्लागार समितीच्या वतीने निरी संस्थेचे संचालक, आयआयटी मुंबईचे प्रतिनिधी, भारतीय हवामान खात्याचे प्रतिनिधी, केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ प्रतिनिधी, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ प्रतिनिधी आणि राजे एडवर्ड स्मारक (केईएम) रुग्णालयातील श्वसन विकार तज्ञ डॉ.अमिता आठवले इत्यादी मान्यवर या संयुक्त बैठकीला उपस्थित होते.

मुंबई महानगर क्षेत्रातील हवा प्रदूषण रोखणे आणि धूळ नियंत्रित करणे यासाठी ठोस उपाययोजना करण्याच्या दृष्टीने या बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली. तसेच मुंबई महानगरात लागू करावयाच्या प्रमाणित कार्यपद्धतीमध्ये कोणकोणत्या मार्गदर्शक सूचना समाविष्ट असल्या पाहिजेत, त्याचा तपशील देखील दोन्ही समित्यांच्या प्रतिनिधींनी मांडला. हवा शुद्धीकरणाची उपाययोजना करताना यंत्रणा उभारणे आवश्यक असल्याने या क्षेत्रातील नामांकित कंपन्यांच्या प्रतिनिधींना देखील या बैठकीमध्ये सादरीकरण करण्यासाठी निमंत्रित करण्यात आले होते. त्यापैकी ७ ते ८ कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते, त्यांनी समितीसमोर आपापल्या तंत्रज्ञानाची माहिती सादर केली.

- Advertisement -

१६ मार्च रोजी अतिरिक्त आयुक्त डॉ. संजीव कुमार यांच्या अध्यक्षतेखाली पुन्हा समितीची बैठक होणार आहे. तसेच महापालिका मुख्यालयात १७ मार्च रोजी संबंधित भागीदारांची मुख्य कार्यशाळा आयोजित करण्याचे येणार आहे. त्यानंतर विभाग कार्यालयांच्या स्तरावर देखील कार्यशाळा आयोजित करून हवा प्रदूषण व धूळ नियंत्रणाची कार्यवाही वेगाने राबवली जाणार आहे. त्या दृष्टीने अतिरिक्त आयुक्त डॉ. संजीव कुमार यांनी विविध सूचना या बैठकीत केल्या.

- Advertisment -