Maharashtra Assembly Election 2024
घरमुंबईMumbai air pollution : BMC च्या तक्रारीनंतर मुंबई पोलिसांकडून पहिला गुन्हा दाखल

Mumbai air pollution : BMC च्या तक्रारीनंतर मुंबई पोलिसांकडून पहिला गुन्हा दाखल

Subscribe

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राजधानी दिल्लीसह (Delhi), मुंबईतील (Mumbai) वायू प्रदूषण (Air Pollution) चिंतेचा विषय ठरत आहे. त्यामुळे वायू प्रदूषणाबाबत मुंबई उच्च न्यायालयाने काही मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. मात्र, तरीही काहीजणांकडून या सूचनांची पायमल्ली होताना दिसत नाही. त्यामुळे आता मुंबई पालिकेच्या तक्रारीनंतर मुंबई पोलिसांना बांधकाम व्यावसायिकांविरुद्ध पहिला गुन्हा दाखल केला आहे. (Mumbai air pollution First case registered by Mumbai police after BMC complaint)

मुंबईतील वाढते वायू प्रदूषण लक्षात घेता मुंबई उच्च न्यायालयाने काही मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. महापालिकेने वायू प्रदूषण रोखण्यासाठी कठोर पाऊलं उचलण्यास सुरुवात केली आहे. नियमांचे पालन करा असे महापालिकेच्या वतीने वारंवार सांगण्यात येत आहे. मात्र, तरी देखील काही बांधकाम व्यावसायिक या नियमांचं सर्रास उल्लंघन करताना दिसून येत आहेत.

- Advertisement -

हेही वाचा – “गरज पडल्यास मुंबईत कृत्रिम पाऊस पाडू”, मुख्यमंत्र्यांची वाढत्या प्रदूषणावर प्रतिक्रिया

महापालिका शहरातील वायू प्रदूषण रोखण्यात अपयशी ठरल्याबद्दल मुंबई उच्च न्यायालयाने नागरी संस्थेवर जोरदार टीका केली. त्यानंतर बीएमसीने सांताक्रूझ पोलीस ठाण्यात एका बिल्डरविरोधात तक्रार दाखल केली. बीएमसीच्या तक्रारीवरून मुंबई पोलिसांनी बिल्डर भारत रियल्टी व्हेंचर्स प्रायव्हेट लिमिटेडविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम 291 (बंद करण्याच्या आदेशानंतर उपद्रव चालू ठेवणं) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

- Advertisement -

बिल्डरला 354A बीएमसी कायद्यांतर्गत नोटीस

बीएमसीने पोलिसांना दिलेल्या तक्रारीनुसार, सांताक्रूझमधील बिल्डर भारत रियल्टी व्हेंचर्स प्रायव्हेट लिमिटेडने आपल्या बांधकाम साईटवर 25 फुट उंचीचा पत्रा न लावता बांधकाम सुरू केलं. तसेच बांधकामाच्या ठिकाणी योग्य काळजी घेतली नाही. त्यामुळे लोकांना धूळ आणि इतर गोष्टींच्या त्रासाला सामोरं जावं लागत आहे. बिल्डरकडून लोकसेवकाच्या आदेशाचं उल्लंघन झाले. त्यामुळे भारत रियल्टी व्हेंचर्स प्रायव्हेट लिमिटेडला 354A बीएमसी कायद्यातंर्गत नोटीस बजावली आहे. त्याची प्रत बीएमसीने सांताक्रूझ पोलीस स्टेशनला दिली आहे. त्यानुसार पोलिसांना बिल्डरविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

हेही वाचा – आता बिनबुडाचे आरोप करणाऱ्यांची तोंडे बंद होतील, चित्रा वाघ यांनी विरोधकांना सुनावले

गरज भासल्यास कृत्रिम पाऊस पाडणार

मुंबईतील स्वच्छता आणि वाढत्या प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर मुंबई महानगरपालिकेकडून करण्यात येणाऱ्या उपाययोजनांची स्वतः उपस्थित राहून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पाहणी आज (21 नोव्हेंबर) पहाटे पाहणी केली. यावेळी एकनाथ शिंदे म्हणाले की, “मुंबईत जिथे विकासकामे सुरू आहेत, ती ठिकाणे कवर करण्यासाठी सांगितली आहेत. त्याचबरोबर मुंबई मेट्रोचे काम मोठ्याप्रमाणात सुरू आहे आणि मुंबईत मोठ्या प्रमाणात बांधकामे सुरू आहेत. यासाठी गरज भासल्यास कृत्रिम पाऊस पाडण्यात येणार आहे, यासाठी दुबईतील एका कंपनीशी करार करण्यात येणार आहे. मुंबईतील हवेचे प्रदूषण कमी करण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. त्यात झाडे लावण्यात येणार असून अर्बन फॉरेस्ट करणार आहे, असे एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -