HomeमुंबईMumbai Air Pollution : मुंबईतील हवेची गुणवत्ता खालावली, पालिकेकडून पाऊल उचलण्यास सुरुवात

Mumbai Air Pollution : मुंबईतील हवेची गुणवत्ता खालावली, पालिकेकडून पाऊल उचलण्यास सुरुवात

Subscribe

गेल्या काही दिवसांपासून मुंबई आणि उपनगरांमध्ये धुक्यांऐवजी दुषित हवा पाहायला मिळत आहे. त्यामुळे मुंबईतील हवेचा दर्जा खालावलेला पाहायला मिळत आहे. परंतु, आता परिस्थिती चिंताजनक बनत चालली असून मुंबईची दुषित हवा आणि दिल्लीतील दुषित हवा यांच्यामध्ये स्पर्धा सुरू आहे की काय? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून मुंबई आणि उपनगरांमध्ये धुक्यांऐवजी दुषित हवा पाहायला मिळत आहे. त्यामुळे मुंबईतील हवेचा दर्जा खालावलेला पाहायला मिळत आहे. परंतु, आता परिस्थिती चिंताजनक बनत चालली असून मुंबईची दुषित हवा आणि दिल्लीतील दुषित हवा यांच्यामध्ये स्पर्धा सुरू आहे की काय? असा प्रश्न निर्माण झाला आहे. सध्या मुंबईचा हवा निर्देशांक 104 इतका नोंदवण्यात आला आहे. ज्यामुळे मुंबईकरांना सध्या प्रदूषणाचा त्रास होत आहे. त्यामुळे आता मुंबई महापालिका प्रशासन आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून कठोर पाऊले उचलण्यास सुरुवात झाली आहे. परंतु, हवेतील गुणवत्ता सुधारणे हे मोठे आव्हान मुंबई महापालिका आणि प्रदूषण नियंत्रण मंडळासमोर आहे. (Mumbai Air Pollution has increased municipal administration has started taking steps)

मुंबईतील विलेपार्ले, कुलाबा, मालाड, कुर्ला, भांडुप, देवनार, बोरिवली, वांद्रे पूर्व या उपनगरांधील हवेची गुणवत्ता अत्यंत वाईट असल्याची नोंद करण्यात आली आहे. त्या मोगामाग आता नेरुळ, महापे, जुहू आणि छत्रपती शिवाजी महाराज विमानतळ या परिसरातील हवेचा दर्जा सुद्धा खालावत चाललेला आहे. याबाबतची नोंदही हवामान विभागाकडून करण्यात आली आहे. मुंबईचा सध्याचा हवेतील निर्देशांक हा 104 इतका नोंदविण्यात आला आला आहे. मुंबईत सुरू असलेल्या बांधकामांमुळे आणि सातत्याने होणाऱ्या हवामानातील बदलामुळे हवेतील गुणवत्तेचा दर्जा ढासाळत चालला आहे, असे सांगण्यात येत आहे. परंतु, यामुळे मुंबईकरांना श्वसनाचा आणि घशाचा आजार होऊ लागला आहे.

हेही वाचा… Maharashtra Weather : नागरिकांनो काळजी घ्या, राज्यातील तपमानात नववर्षात होणार मोठे बदल

मुंबईमध्ये वातावरणात घातक मानल्या जाणाऱ्या पीएम 2.5 आणि पीएम 10 धुलीकणांचे प्रमाणही वाढले आहे. त्याचबरोबर देवनार, कुर्ला, कांदिवली, मालाड, नेव्ही नगर, कुलाबा, शिवडी, वरळी परिसरातही वाईट हवेची नोंद करण्यात आली आहे. मुंबईतील हवेची गुणवत्ता सातत्याने खालावत असलेल्या स्तराचा सामना करण्यासाठी मुंबई महापालिकेने उपाययोजना करण्यास सुरुवात केली आहे. मुंबई महापालिकेने पुढील काही दिवस सातत्याने रस्त्यांवर पाणी फवारणी करत आहे. सध्या ही कारवाई अधिक तीव्र करण्यात आली आहे. सध्या मुंबई महापालिकेकडून सर्व 24 विभागांमध्ये ट्रक-माउंटेड फॉग मिस्ट कॅनन युनिट्स तैनात करण्यात आल्या आहेत. त्याशिवाय 100 हून अधिक टँकर रस्त्यावर साफसफाईसाठी तैनात असल्याची माहिती महानगरपालिकेने दिली आहे.विशेषत: बांधकाम पाडणे आणि उत्खनन सुरू असलेल्या ठिकाणांवर मुंबई महापालिकेने लक्ष ठेवून आहे.


Edited By Poonam Khadtale