घरदेश-विदेशमुंबई विमानतळाची मुख्य धावपट्टी पाच महिने बंद

मुंबई विमानतळाची मुख्य धावपट्टी पाच महिने बंद

Subscribe

छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळाची मुख्य धावपट्टी दुरुस्तीसाठी 4 नोव्हेंबरपासून पाच महिने दररोज आठ तास बंद राहणार आहे. त्यामुळे दररोज हवाई वाहतुकीवर आणि विमानाच्या तिकीट दर वाढण्याचे चिन्ह दिसून येत आहेत.

यंदाच्या पावसामुळे छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळाची मुख्य धावपट्टी मोठया प्रमाणात खराब झाली होती. त्यामुळे पावसाळा संपताच मुख्य धावपट्टी दुरस्ती करण्याचा निर्णय घेतला आहेत. धावपट्टी दुरुस्तीसाठी 4 नोव्हेंबर 2019 ते 28 मार्च 2020 पर्यंत दररोज सकाळी 9.30 ते सायंकाळी 5.30 दरम्यान उड्डाण कार्यासाठी बंद असेल असे मुंबई विमानतळाचे प्रवक्त्याने यांनी सांगितले.

- Advertisement -

उड्डाण बंद ठेवल्यामुळे त्याचा परिणाम निश्चितच विमानसेवेवर होणार आहे. त्यामुळे दुसर्‍या धावपट्टीवरून विमानाचे टेक ऑफ आणि लँडिंग होऊ शकणार आहे. त्यामुळे विमान तिकीटदरात 50 टक्क्यांपर्यंत वाढ होण्याची देखील शक्यता आहे. छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ हे देशातील सर्वांत व्यस्त विमानतळांपैकी एक आहे. येथील दोन धावपट्ट्यांपैकी मुख्य धावपट्टीवरून तासाला 46 विमानांचे आगमन व उड्डाण होते; तर दुय्यम धावपट्टीवरून तासाला 35 विमानांचे उड्डाण व आगमन होते. या विमानतळावरून दिवसाला सुमारे 970 विमानांचे उड्डाण आणि आगमन होते.

29 मार्च 2020 नंतर मात्र वाहतूक पूर्ववत
मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर एकमेकांना भेदणार्‍या दोन धावपट्ट्या आहेत. दोन धावपट्ट्या जिथे जुळतात, त्याच भागात दुरुस्तीचे काम होणार आहे. यामुळे दोन्ही धावपट्ट्या बंद ठेवाव्या लागणार आहेत. मुख्य धावपट्टी दुरुस्तीसाठी पाच महिन्यांचा कालावधी लागणार आहे. दुरुस्तीच्या कामामुळे दुरुस्ती बंद असेल त्या दिवसांतील तिकीटदरावर देखील परिणाम होणार आहे. 29 मार्च 2020 नंतर मात्र वाहतूक पूर्ववत होणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -