घरठाणेठाणे, मुंबईत धुक्याची चादर

ठाणे, मुंबईत धुक्याची चादर

Subscribe

रविवारी मुंबई आणि ठाण्यात पहाटे दाट धुक्यांची चादर पसरली होती. मुंबई आणि ठाणेकरांसाठी अपरिचित असलेले धुके सर्वत्र पसरले होते. अर्थात हे धुके की प्रदूषण असा प्रश्नही मुंबई, ठाणेकरांना पडला. मात्र, तरीही त्या धुक्यातून वाट काढत चालण्याचा मोह काही मुंबई, ठाणेकरांना आवरता आला नाही. मुंबईच्या पश्चिम उपनगरात हवेत गारवा तर होताच, त्याचबरोबर धुक्याची चादर ही पसरली होती. गेले तीन दिवस अवकाळी पावसानंतर मुंबईचा पारा बर्‍यापैकी खाली आला असून धुरकट वातावरण निर्माण झाली होती.

मुंबईमध्ये हे प्रचंड धुके पसरल्याने मुंबईचे वातावरण आल्हाददायक वाटत होते. मात्र, याचा परिणाम वाहतुकीवर झाला होता. या वातावरणात मुंबईकर मात्र पहाटे या धुक्याचा आणि थंडीचा आस्वाद घेण्यास बाहेर पडले होते.
आता अरबी समुद्रातील निर्माण झालेली कमी दाबाची स्थिती निवळत आहे. त्याचप्रमाणे कुठेही नव्याने कमी दाबाचा पट्टा निर्माण झालेला नाही. त्यामुळे राज्यात सर्वत्र पावसाळी वातावरण दूर होऊन कोरडे हवामान निर्माण होण्याचा अंदाज आहे. सध्या ढगाळ हवामानामुळे दिवसाच्या कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत मोठी घट झाल्याने दिवसाचा गारवा कायम आहे. रात्रीचे किमान तापमान मात्र सरासरीपेक्षा अधिक आहे. 5 डिसेंबरपासून हवामान कोरडे झाल्यानंतर दिवसाचे कमाल तापमान सामान्य स्थितीत येऊन रात्रीच्या किमान तापमानात घट होईल. अशी माहिती हवामान विभागाने दिली आहे.

- Advertisement -

ठाण्यातही मागील काही दिवसांत चांगलाच पाऊस झाला होता. रविवारी पाऊस नव्हता मात्र ठाणे जिल्ह्यात पहाटे धुक्याचे साम्राज्य पसरले होते. धुक्यामुळे पुढील रस्ता दिसेनासा झाला होता. खूप वर्षांनंतर पडलेल्या या धुक्क्याचा आनंद घ्यायला ठाणेकर पहाटेच मॉर्निंग वॉकच्या निमित्ताने घराबाहेर पडले होते. मैदान, सार्वजनिक बाग, तलाव काठ माणसांनी भरून गेले होते. प्रत्येकजण या धुक्याचा आनंद घेत होता. मात्र, त्याचवेळी हे नक्की धुकेच की प्रदूषण असा सवालही उपस्थित करण्यात येत होता.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -