घरमुंबईतराफा पी-३०५ दुर्घटना प्रकरण: कॅप्टन राकेश बल्लाव, मुख्य अभियंत्यासह अनेकांविरोधात गुन्हा दाखल

तराफा पी-३०५ दुर्घटना प्रकरण: कॅप्टन राकेश बल्लाव, मुख्य अभियंत्यासह अनेकांविरोधात गुन्हा दाखल

Subscribe

तौक्ते चक्रीवादळाच्या तडाख्यात बॉम्बे हायजवळील तेल उत्खनन करणाऱ्या पी-३०५ या तराफ्यावर दुर्घटना घडली. या तराफ्यावरील एकूण ४९ जणांचे मृतदेह गुरुवारी सायंकाळी सापडले आहेत तर २६ जण अद्याप बेपत्ता आहेत. या दुर्घटने प्रकरणी मुंबई पोलिसांकडून पी-३०५ तराफ्य़ावरील कॅप्टन राकेश बल्लाव, मुख्य अभियंता रहमान शेख यांच्यासह इतर काही जणांविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. या सर्वांविरोधात ३०४ (२) ,३३८, ३४ आयपीसी कलमाअंतर्गत गुन्हा नोंदविला आहे.

याप्रकरणी येलोगेल पोलिसांनी पी-३०५ तराफ्य़ावरील मुख्य अभियंता रेहमान शेख यांना गुरुवारी चौकशीसाठी बोलावले होते. यावेळी चक्रीवादळाची पूर्वसूचना मिळाल्यापासून बार्ज बुडेपर्यंतचा घटनाक्रम पोलिसांनी जाणून घेण्याचा प्रयत्न केला. नौदलामुळे सुरक्षितरित्या बचावलेले शेख सध्या ताडदेव अपोलो रुग्णालयात उपचार घेत आहेत.

- Advertisement -

तौक्ते चक्रीवादळाने रौद्र रुप धारण केल्याने बॉम्बे हायजवळी तेल विहिरींवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना राहण्यासाठी तयार केलेला ‘पी ३०५’ हा तराफा समुद्रात बुडाला. या तराफ्यावरील २६ कर्मचाऱ्यांचे मृतदेह बुधवारी रात्रीपर्यंत मिळाले होते. आणखी २३ कर्मचाऱ्यांचे मृतदेह गुरुवारी सायंकाळपर्यंत सापडले. त्यामुळे मृतांचा एकूण आकडा ४९ झाला आहे. अद्यापही २६ कर्मचाऱ्यांचा शोध लागू शकलेला नाही. पी-३०५ या तराफ्यावर एकूण २६१  कर्मचारी होते. दरम्यान नौदलाची शोधमोहिम सुरू आहे. आयएनएस कोलकाता ही युद्धनौका बुधवारी रात्री उशिरा बचावलेले कर्मचारी आणि मृतदेह घेऊन मुंबईच्या किनाऱ्यावर आली. आयएनएस बियास ही युद्धनौका आणखी काही मृतदेह घेऊन गुरुवारी मुंबईत परतली. या तराफ्याशिवाय वरप्रदा या नौकेलाही जलसमाधी मिळाली. त्यावरील २ कर्मचाऱ्यांना वाचवण्यात नौदलाला यश आले असून, उर्वरित ११ कर्मचारी अद्याप बेपत्ता आहेत.

कॅप्टनचा निर्णय चुकला आणि २६१ कर्मचारी अडकले!

समुद्रात तौत्के चक्रीवादळ येणार याची पूर्व कल्पना असतानाही तराफा पी-३०५ च्या कॅप्टनने बंदरावर परत न जाता समुद्रातच राहण्याचा चुकीचा निर्णय घेतल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. ओएनजीसीच्या तेल उत्खनन प्रकल्पावर काम करण्याचे कंत्राट अ‍ॅफकॉन कंपनीकडे होते. याच अ‍ॅफकॉन कंपनीने नियुक्त केलेले २६१ कर्मचारी तराफा पी-३०५ वर होते.

- Advertisement -

ही डुमॅस्ट या कंपनीची जबाबदारी

या प्रकरणी अफकॉन या कंपनीने प्रसिद्धी पत्रक जाहीर केले आहे. या प्रसिद्धीपत्रकात असे म्हणण्यात आले आहे की, तौक्ते चक्रीवादळामुळे समुद्रात बुडालेला ‘पी ३०५’ हा तराफा डुमॅस्ट या कंपनीचा असून त्याची संपूर्ण जबाबदारी ही त्यांचीच आहे. त्याचबरोबर या तराफ्यावरील नाविक किंवा खलाशी हे डुमॅस्ट कंपनीचे कर्मचारी होते.


Nude video leak ११ वर्षांनीही राधिका आपटेला दुखावतोय, घटनेनंतर ४ दिवस स्व:ला कोंडून घेतले


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -