घरमुंबईमुंबईतील ३२० कामांचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्या होणार भूमिपूजन

मुंबईतील ३२० कामांचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्या होणार भूमिपूजन

Subscribe

मुंबई सुशोभीकरण प्रकल्प अंतर्गत पहिल्या टप्प्यातील ५०० कामांचे भूमिपूजन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ८ डिसेंबर २०२२ आणि १० डिसेंबर २०२२ रोजी करण्यात आले होते. आतापर्यंत १२१ कामे पूर्ण झाली आहेत. त्या कामांना जनतेकडून चांगला प्रतिसाद लाभला आहे, असा दावा पालिका प्रशासनाने केला आहे,

 

मुंबईः महापालिकेच्या वतीने संपूर्ण मुंबई महानगराचे सुशोभीकरण करण्यासाठी ५०० कामांचा समावेश असलेला विशेष प्रकल्प सध्या प्रगतिपथावर आहे. या प्रकल्पाच्या अंतर्गत अतिरिक्त ३२० कामे हाती घेण्यात येणार आहे. या कामांचे भूमिपूजन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्या, २६ फेब्रुवारीला चेंबूर (पश्चिम), टिळक नगर परिसरातील लोकमान्य टिळक क्रीडांगण येथे होणार आहे. मुंबईतील रस्ते सिमेंट काँक्रिटीकरण अंतर्गत, ५२ किलोमीटर लांबी असलेल्या १११ रस्त्यांच्या कामांचा प्रत्यक्ष प्रारंभ तसेच, टिळक नगर, नेहरु नगर व सहकार नगरातील मलनि:सारण वाहिन्यांच्या कामांचे भूमिपूजन देखील या निमित्ताने होणार आहे.

- Advertisement -

मुंबई सुशोभीकरण प्रकल्प अंतर्गत पहिल्या टप्प्यातील ५०० कामांचे भूमिपूजन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ८ डिसेंबर २०२२ आणि १० डिसेंबर २०२२ रोजी करण्यात आले होते. आतापर्यंत १२१ कामे पूर्ण झाली आहेत. त्या कामांना जनतेकडून चांगला प्रतिसाद लाभला आहे, असा दावा पालिका प्रशासनाने केला आहे, उर्वरित कामेही प्रगतिपथावर आहेत. आता दुसऱ्या टप्प्यात अतिरिक्त ३२० कामे प्रशासनाने हाती घेतली आहेत. या कामांचे भूमिपूजन मुख्यमंत्री व उप मुख्यमंत्री यांच्या हस्ते होणार आहे. मुंबई सुशोभीकरण प्रकल्पामुळे मुंबईचा कायापालट होत आहे. येणाऱ्या काळात मुंबई महानगर अधिक सुंदर व देखणे होईल, असा विश्वासही पालिका प्रशासनाने केला आहे.

५२ किलोमीटर लांब अंतराच्या १११ रस्ते कामांचा होणार प्रारंभ
मुंबई महानगरातील रस्ते कायमस्वरुपी खड्डेमुक्त करण्याच्या प्रयत्नांचा भाग म्हणून महापालिकेने रस्ते सिमेंट काँक्रिटीकरण काम हाती घेतले आहे. त्यातील, एकूण ५२ किलोमीटर लांब अंतराच्या १११ रस्ते कामांची सुरुवात यानिमित्ताने करण्यात येणार आहे. यामध्ये, पूर्व उपनगरातील ११.०६ किलोमीटर लांबीचे २४ रस्ते, पश्चिम उपनगरातील ३१ किलोमीटर लांबीचे ६१ रस्ते आणि शहर विभागातील ९.६६ किलोमीटर लांबीचे २६ रस्ते समाविष्ट आहेत.

- Advertisement -

मलनिःसारण वाहिनी पुरविणे व वाहिन्या टाकणे
त्याचप्रमाणे, महापालिकेच्या मलनि:सारण प्रकल्प खात्याद्वारे चेंबूर भागातील म्हाडा वसाहतीमधील टिळक नगर, कुर्ला परिसरातील नेहरु नगर व सहकार नगर मधील विद्यमान मलनिःसारण जाळ्याची सुधारणा करण्यासाठी विविध रस्त्यांवर मलनिःसारण वाहिनी पुरविणे व वाहिन्या टाकणे ही कामे केली जाणार आहेत. पैकी टिळक नगरामध्ये १,३९० मीटर लांब, नेहरु नगरामध्ये १,५५० मीटर लांब तर सहकार नगर येथे २०० मीटर लांब अंतराचे मलनि:सारण जाळे उन्नतीकरण करण्यात येणार आहे. या कामांचे भूमिपूजन देखील यावेळी करण्यात येईल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -