घरमुंबई'राज ठाकरेंनी आता चला हवा येऊ द्या पाहावं'!

‘राज ठाकरेंनी आता चला हवा येऊ द्या पाहावं’!

Subscribe

राज ठाकरे यांनी व्यंगचित्र काढून मोदींच्या मुलाखतीवर केलेली टीका भाजपच्या चांगलीच जिव्हारी लागली असून त्यावर मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी ट्विटरवर खोचक टिप्पणी केली आहे.

झी मराठी चॅनेलवर ‘चला हवा येऊ द्या’ हा कॉमेडी शो भलताच फेमस आहे. पण आता हा शो मनोरंजन विश्वासोबतच राजकारणात देखील येऊन दाखल झाला आहे. आणि तोही भाजपकडून आणण्यात आला आहे. भाजपचे मुंबई अध्यक्ष आणि आमदार आशिष शेलार यांनी ‘चला हवा येऊ द्या’ पाहाण्याचा सल्ला दिला आहे. आणि तोही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना! पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मुलाखतीवर राज ठाकरेंनी व्यंगचित्र काढून खोचक टिप्पणी केली होती. तसाच खोचक सल्ला आता आशिष शेलार यांनी राज ठाकरेंना दिला आहे. त्यामुळे मुंबईत आता ‘राजकीय’ चला हवा येऊ द्याचा फड रंगणार की काय? अशीच शक्यता निर्माण झाली आहे!

मुलाखत मॅनेज होती?

पंतप्रधान नरेंद्र मोदींना १ जानेवारीला एएनआय या वृत्तसंस्थेला मुलाखत दिली होती. यामध्ये गेल्या ४ वर्षांमधल्या भाजप सरकारच्या कामगिरीपासून ते राफेल करारापर्यंत सर्व मुद्द्यांवर त्यांनी मुलाखतकार महिला पत्रकाराला उत्तरं दिली. मात्र, ही मुलाखत म्हणजे मोदींनी स्वत:चीच घेतलेली मुलाखत होती अशा आशयाचं व्यंगचित्र काढून राज ठाकरेंनी मोदींच्या मुलाखतीची खिल्ली उडवली होती. त्यांचे व्यंगचित्र हा चर्चेचा विषय ठरला होता. मात्र आता त्यावर भाजपकडून आशिष शेलार यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

- Advertisement -

‘वेळ आहे म्हणून कार्टून काढतात’

राज ठाकरेंनी काढलेल्या व्यंगचित्रावर आशिष शेलार यांनी ट्विटरच्या माध्यमातून टीका केली आहे. आशिष शेलारांनी थेट राज ठाकरेंचं नाव जरी या ट्विटमध्ये घेतलं नसलं, तरी त्यांचा रोख राज ठाकरेंकडेच असल्याचं या ट्विटमधून स्पष्टपणे समोर येत आहे. ‘लोकांच्या प्रश्नांपेक्षा मीपणा जोपासण्यात जे धन्यता मानतात, त्यांना प्रथम राष्ट्र, मग पक्ष आणि शेवटी मी अशी जीवननिष्ठा असलेल्यांच्या मुलाखती समजणं थोडं अवघडच असणार! वेळ असल्यामुळे कार्टून काढत चला हवा येऊ द्या बघायला हरकत नाही! आमच्या शुभेच्छा!’ असं ट्वीट आशिष शेलार यांनी केलं आहे.

- Advertisement -

हेही वाचा – राज ठाकरेच आमचा खरा राजा – महेश मांजरेकर

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मुलाखतीवर काँग्रेसकडून देखील टीका करण्यात आली आहे. ‘मोदींची मुलाखत म्हणजे खोदा पहाड और निकला चुहा’ असल्याची प्रतिक्रिया मुलाखतीनंतरच लगेचच काँग्रेसने घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी दिली होती.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -