Saturday, July 24, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर मुंबई पावसाळी आजारांनी मुंबईकर हैराण,रुग्णालय हाऊसफुल

पावसाळी आजारांनी मुंबईकर हैराण,रुग्णालय हाऊसफुल

महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी रुग्णालयात दाखल होणाऱ्या प्रत्येक रुग्णावर व्यवस्थितपणे औषधोपचार,देखरेख तसेच योग्य वैद्यकीय सुविधा देण्यात येईल अशी माहिती दिली आहे. 

Related Story

- Advertisement -

 

गेल्या दिड वर्षापासून सर्व नागरिक कोरोना महामारीचा सामना करत आहे. सध्या कोरोना महामारीची दुसरी लाट हळूहळू ओसरताना दिसत आहे. अशातच कोरोना रुग्णसंख्येत घट होत असून. एकंदरीत कोरोना व्हायरसचे संकट टळताना दिसत आहे. याचदरम्यान आता जून महिन्यापासून मान्सूनला सुरुवात झाल्याने नागरिकांना अनेक पावसाळी आजारांना आता तोंड द्यावे लागत आहे. सर्दि,खोकला,ताप,डोकेदुखी,व्हायरल इंन्फेक्शन, डेंग्यू,मलेरीया,टायफॉई सारख्या आजारांची साथ आता वाढतांना दिसत आहे. अशातच महापालिका रुग्णांलयामध्ये रुग्णांची गर्दी वाढण्यास सुरूवात झाली असून. महापालिकातर्फे कोरोना रुग्णांची व्यवस्था ज्या ठिकाणी करण्यात आली होती अशा जवळच्या रुग्णालयात किंवा कोरोना उपचार केंद्रामध्ये पावसाळी आजाराचा सामना करणाऱ्या रुग्णांवर उपचार करण्याचे आदेश देण्यात आले. तसेच कोरोना वार्डमध्ये स्वच्छता,निर्जंतुकीकरण,योग्य औषधोपचाराची सोय रुग्णांसाठी करण्यात आल्याचे महापालिकातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.
महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी रुग्णालयात दाखल होणाऱ्या प्रत्येक रुग्णावर व्यवस्थितपणे औषधोपचार,देखरेख तसेच योग्य वैद्यकीय सुविधा देण्यात येईल अशी माहिती दिली आहे.  ज्या महापालिका रुग्णालयांमध्ये  रुग्णसंख्येत वाढ होत असल्यास कोरोनामुक्त रुग्णांना तातडीने घरी पाठवून पावसाळी आजाराचा सामना करणाऱ्या रुग्णांना भरती करण्यात यावे असे निर्देश दिले आहे. तसेच उपचारानंतर बऱ्या होणाऱ्या रुग्णांची भायखळा उपचार केंद्रात सोय करण्यात यावी असे देखील सांगण्यात आले आहे.

- Advertisement -

कोरनाचा प्रादुर्भाव कमी होत असल्याने कोरोना चाचणी करणाऱ्या रुग्णांमध्ये देखील घट झालेली पाहायला मिळते तसेच यानंतर डेंग्यू,मलेरीया,टायफॉई सारख्या आजारांमध्ये वाढ होत असून अशा रुग्णांच्या रक्त तपासणीची संख्या वाढत आहे. अशी माहिती डॉ.एस.आर.मोरे यांनी दिली आहे.


हे हि वाचा –गर्दी रोखण्यासाठी धोरण ठरवा; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची पंतप्रधानांना विनंती

- Advertisement -