घरCORONA UPDATEम्युकोरमायकोसिस रूग्णांसाठी मुंबई महापालिका उभारणार स्पेशल टास्क फोर्स

म्युकोरमायकोसिस रूग्णांसाठी मुंबई महापालिका उभारणार स्पेशल टास्क फोर्स

Subscribe

टास्क फोर्स समिती म्युकोरमायकोसिस संबंधित सर्व केसेस हाताळेल व त्यावर उपचारांचा योग्य मार्ग सांगेल

कोरोनानंतर राज्यात म्युकोरमायकोसिसचे संकट आले आहे. मुंबईतही म्युकोरमायकोसिसचे रुग्ण वाढत आहेत. मुंबईतील वाढत्या म्युकोरमायकोसिस रुग्णांच्या उपचारांसाठी मंबई महापालिकेकडून स्पेशल टास्कफोर्स उभारण्याच्या निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी टास्क फोर्सची एक समिती गठीत करण्यात येणार आहे. शहरात १०० हून अधिक कोरोनातून बऱ्या झालेल्या रुग्णांवर सातत्याने लक्ष ठेवण्याची गरज आहे, असे नागरी अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. म्युकोरमायकोसिस या बुरशीजन्य आजार झालेल्या रुग्णांवर स्थानिक पातळीवर औषधोपचार करण्याचे निर्देश रुग्णालय अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. महापालिकेकडून उभारण्यात येणारी टास्क फोर्स समिती म्युकोरमायकोसिस संबंधित सर्व केसेस हाताळेल व त्यावर उपचारांचा योग्य मार्ग सांगेल,असे पालिकेकडून सांगण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कोरोनातून बरे झालेल्या १५१ रुग्णांनाम्युकोरमायकोसिस हा बुरशीजन्य आजार झाला आहे. मुंबईच्या जे जे रुग्णालयात ४०, नायर रुग्णालयात ३८ रुग्णांवर उपचार सुरु आहेत तर केईममध्ये ३४, सायन रुग्णालयात ३२ तर कूपर रुग्णालयात ७ जणांवर म्युकोरमायकोसिसवर उपचार सुरु आहेत. म्युकोरमायकोसिस आजाराच्या उपचाराचा मार्ग ठरविण्यासाठी तज्ज्ञ डॉक्टरांची टिम नेमली आहे. ENT तज्ञ,नेत्ररोग तज्ञ, सूक्ष्मजीव तज्ञ आणि भूलतज्ञांचा या टिममध्ये समावेश असल्याचे मुंबईचे आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितेल आहे. सर्व रुग्णालयांना या रोगाच फैलाव रोखण्यासाठी उपाययोजनांच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

- Advertisement -

म्युकोरमायकोसिस हा आजार फार दुर्मिळ होता. मात्र कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत या आजाराचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. अँटी फंगल अम्फोटेरिसीन बी हे औषध सध्या म्युकोरमायकोसिस आजारावर वापरले जात आहे. रुग्णालयांना ही औषधे खरेदी करण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. मुंबईच्या जे जे रुग्णालयातील ENT विभागाचे डॉ. श्रीनिवास चव्हाण यांनी दिलेल्या महितीनुसार, सध्या ते तीन प्रकारच्या म्युकोरमायकोसिस उपचार करत आहेत. नाकात अडथळा निर्माण होणे, दुर्गंधी येणे,नाकातून स्राव होणे यासारखी लक्षणे दिसल्यास त्वरित म्युकोरमायकोसिसची तपासणी केली पाहिले,असे त्यांनी म्हटले आहे

कोरोनाचे रुग्ण अधिक संवेदनशील असतात. त्यांच्या शरीरात रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी त्यांनी स्टिराईड दिले जातात. टॉसिलिझुमब आणि रेमडेसिवीर सारख्या इंजेक्शनमुळे त्यांची रोगप्रतिकारक शक्ती बदलते. कोरोना रुग्णांना देण्यात आलेले स्टिरॉइड शरीरारत साखरेचे प्रमाण वाढवते,बुरशी वाढण्यात लागणारे वातारण तयार होते,असे डॉक्टरांनी सांगितले आहे. त्यामुळे शरीरात साखर नियंत्रणात राहण्यासाठी जनजागृती करणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे कोणतीही लक्षणे दिसल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या.

- Advertisement -

हेही वाचा – Mumbai Corona Update: गेल्या २४ तासात मुंबईच्या रुग्णसंख्येत वाढ,६६ जणांचा मृत्यू

 

 

 

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -