घरताज्या घडामोडीदोन्ही वेळेस नापास झाला, म्हणून बसवला डमी विद्यार्थी!

दोन्ही वेळेस नापास झाला, म्हणून बसवला डमी विद्यार्थी!

Subscribe

'परीक्षा केंद्रावर उपस्थित असलेला विद्यार्थी हा डमी असल्याचे निश्चित झाल्यावर आम्ही शहापूर पोलिसांकडे या घटनेची माहिती दिली असता, पोलिसांनी राहूल घावत हा विद्यार्थी या पूर्वी दोन वेळा दोन विषयांमध्ये नापास झाला असून त्याने नितेश धपाटेला त्याचे सर्व लेखी पेपर लिहीण्यासाठी नेमले आहे', अशी माहिती पोलिसांनी दिली.

शहापूर येथे बारावीच्या परीक्षेला डमी विद्यार्थी बसवल्याचा प्रकार समोर आला आहे. शहापूर पोलिसांनी एका २१ वर्षीय तरूणाला डमी विद्यार्थी म्हणून पकडण्यात आले आहे. हा तरूण ठाणे जिल्ह्यातील खर्डी येथे बारावीच्या इंग्रजी विषयाचा पेपर लिहीताना पकडला गेला आहे. या प्रकरणी संबंधीत परीक्षार्थी विद्यार्थ्याला देखील ताब्यात घेण्यात आले आहे.

नेमके काय झाले?

मंगळवार पासून बारावीच्या परीक्षेला सुरूवात झाली आहे. शहापूरतील खर्डी येथे परीक्षा केंद्रावरील पर्यवेक्षक विद्यार्थांची यादी तपासत असताना एका विद्यार्थ्याकडे असलेले हॉलतिकीट आणि बोर्डाच्या यादीवरील त्या विद्यार्थ्याचा फोटोत भिन्न दिसत होते. ही बाब पर्यवेक्षकांनी संबंधीत केंद्रप्रमुखांच्या निदर्शनास आणून दिली. केंद्रप्रमुखांनी याची नोंद घेतली असता परीक्षेला उपस्थित असलेला विद्यार्थी हा डमी विद्यार्थी असल्याचे त्यांच्या लक्षात आले.

- Advertisement -

शहापुर खर्डी येथील परीक्षा केंद्रावर पकडण्यात आलेल्या डमी विद्यार्थ्याचे नाव नितेश धपाटे (२१) असून हा राहूल घावत (१९) याच्या वतीने परीक्षा केंद्रावर परीक्षा देत असल्याचे खर्डी येथील परीक्षा केंद्रप्रमुख महाजन यांनी सांगितले आहे. तसेच ते म्हणाले आहेत की, ‘परीक्षा केंद्रावर उपस्थित असलेला विद्यार्थी हा डमी असल्याचे निश्चित झाल्यावर आम्ही शहापूर पोलिसांकडे या घटनेची माहिती दिली असता, पोलिसांनी राहूल घावत हा विद्यार्थी या पूर्वी दोन वेळा दोन विषयांमध्ये नापास झाला असून त्याने नितेश धपाटेला त्याचे सर्व लेखी पेपर लिहीण्यासाठी नेमले आहे’, अशी माहिती पोलिसांनी दिली. शालेय प्रशासनानी सोमवारी याची माहिती बोर्डाला दिली. मात्र ‘या प्रकरणाबाबत आम्ही केंद्राकडून स्पष्टीकरण मागू’ , असे मुंबई विभाग सचिव संदीप सांगवे यांनी सांगितले.

पेपर फाडणाऱ्या विद्यार्थ्यांवर कारवाई?

याच प्रमाणे सोमवारी गोरेगाव येथील नुतन विद्यालयात असाच एक प्रकार समोर आला आहे. नुतन विद्यालयातील बारावीच्या परीक्षा केंद्रामध्ये एका विद्यार्थ्याने स्वत: चीच उत्तरपत्रिका फाडून घेतल्याचा प्रकार समोर आला आहे. बोर्डाच्या अहवालानूसार अशा प्रकारे परीक्षेच्या कालावधीत या घटना वाढत आहे, भिवंडीत परीक्षा केंद्रावर फोन तसेच ब्लूथूज सारख्या आधूनिक तंत्रज्ञानाचा वापर करून कॉपी करत असल्याचे स्पष्ट झाले आहे. या संबंधीत सविस्थर अहवाल बोर्डाकडून लवकरच पाठवण्यात येणार आहे. ‘विद्यार्थ्यांनी केवळ आपला पेपर लिहीने अपेक्षित असते मात्र, विद्यार्थ्याने स्वत:चा पेपर फाडला किंवा जर विद्यार्थ्यांनी बोर्डाची इतर मालमत्तेचे नुकसान केले असता त्याची नोंद गैरवर्तन म्हणून करण्यात येते’. असे सांगावे यांनी स्पष्ट केले आहे.

- Advertisement -

बोरीवली आणि वांद्रेत देखील गैरवर्तन

मुंबईतील बोरीवली आणि वांद्रे येथील केंद्रावर विद्यार्थी एकमेकांच्या पेपरात डोकावून कॉपी करताना आढळले, अशा वेळेस विद्यार्थ्यांना इतर पेपर लिहीण्यासाठी परवानगी दिली जाते. यावर बोर्डाने सांगितले की नंतर विद्यार्थ्यांवर त्यांची बाजू ऐकून मग कारवाई करण्यात येते. बारावीच्या ९४,९७३ विद्यार्थांनी सोमवारी भौतिकशास्त्राची परीक्षा दिली आहे. तसेच २९,२३१ विद्यार्थांनी राज्यशास्राचा पेपर लिहीला होता या पेपर दरम्यान कोणताही गैरवर्तनाचा प्रकार घडला नाही. तर सोमवारी ११९ गैरवर्तनाच्या तक्रारी असल्याची माहिती आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -