Monday, June 5, 2023
27 C
Mumbai
घर मुंबई मुंबईला बॉम्बने उडवण्याची धमकी देणारा अटकेत; पोलिसांची कारवाई

मुंबईला बॉम्बने उडवण्याची धमकी देणारा अटकेत; पोलिसांची कारवाई

Subscribe

देशाची आर्थिक राजधानी मुंबईत पुन्हा एकदा दहशत माजवण्याची धमकी पोलिसांना देण्यात आली होती. एका अज्ञात व्यक्तीने ट्वीट करत मुंबईला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली होती. आता याबाबत मुंबई क्राईम ब्रांचच्या पथकाला मोठं यश आलं आहे. पोलिसांनी धमकी देणाऱ्याच्या मुसक्या आवळल्या आहेत. धमकी दिल्याप्रकरणी पोलिसांनी नांदेड जिल्ह्यातील एका 19 वर्षीय तरुणाला अटक केली आहे.

Mumbai Blast Threat Call: देशाची आर्थिक राजधानी मुंबईत पुन्हा एकदा दहशत माजवण्याची धमकी पोलिसांना देण्यात आली होती. एका अज्ञात व्यक्तीने ट्वीट करत मुंबईला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली होती. आता याबाबत मुंबई क्राईम ब्रांचच्या पथकाला मोठं यश आलं आहे. पोलिसांनी धमकी देणाऱ्याच्या मुसक्या आवळल्या आहेत. धमकी दिल्याप्रकरणी पोलिसांनी नांदेड जिल्ह्यातील एका 19 वर्षीय तरुणाला अटक केली आहे. ( Mumbai bomb threat arrested Mumbai Crime Branch action )

या तरुणाने ट्वीटरवर विध्वसंक कृत्य करण्याची धमकी दिली होती. हे ट्वीट त्याने मुंबई पोलिसांना टॅग केले होते. त्यानुसार मुंबई पोलिसांनी कारवाई केली. श्रीपद गोरठकर असं या तरुणाचे नाव आहे.

धमकी देणाऱ्या तरुणाची चौकशी सुरु

- Advertisement -

19 वर्षीय श्रीपाद गोरठकर हा तरुण नायगाव तालुक्यातील नावंदी येथील रहिवासी आहे. शिक्षणासाठी तो नांदेडला राहत होता. काही दिवसांपूर्वी या विद्यार्थ्याने आपल्या ट्वीट हॅन्डलवरुन मुंबईत विध्वसंक कृत्य करण्याची धमकी देणारं ट्वीट केलं होतं. हा मेसेज मुंबईच्या पोलीस आयुक्तांना टॅगदेखील केला होता. ही बाब मुंबईच्या सायबर सेल आणि क्राईम ब्रँचला लक्षात आली. त्यानंतर मुंबईच्या सीआययू युनिटने तत्काळ कारवाई करत मेसेज पाठवणाऱ्या तरुणाचा शोध घेतला आणि तो तरुण जिल्ह्यातील नायगाव तालुक्यातील नावंदी येथील रहिवासी असल्याचं समजलं.

त्यानंतर तत्काळ मुंबई पोलिसांनी नांदेडचे पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांना याबाबत माहिती दिली. सोमवारी रात्री 2 वाजेच्या सुमारास मुंबई क्राईम ब्रांचचे कर्मचारी नायगाव पोलिसांच्या मदतीने त्या तरुणाच्या घरी धडकले. त्यानंतर त्या तरुणाला ताब्यात घेण्यात आलं. आता पोलीस या तरुणाची कसून चौकशी करत आहेत. चौकशीअंती का धमकी दिली याबाबत लवकरच खुलासा होण्याची शक्यता आहे.

- Advertisement -

( हेही वाचा: महापुरुषांचा अपमान होत असताना भाजपा नेत्यांची तोंडे बंद का होती? नाना पटोलेंचा सवाल )

मुंबई पोलिसांना २६/११ सारख्या हल्ल्याच्या धमक्या

दुसरीकडे, रविवारी 21 मे रोजी एका व्यक्तीने मुंबई पोलिसांना फोन करून २६/११ हल्ल्याप्रमाणे शहरात हल्ला केला जाणार असल्याचं सांगितलं. पोलिसांना हा संशयास्पद कॉल राजस्थानमधून आला होता, त्यानंतर राजस्थान पोलिसांना याची माहिती देण्यात आली. या प्रकरणावर तत्काळ कारवाई करत राजस्थान पोलिसांनी आरोपीला अटक केली होती.

- Advertisment -