CSMT bridge Collapse: चिमुरडीला मागे सोडून… तपेंद्र गेले

तपेंद्र यांच्या पश्चात त्यांची पत्नी, आई, दीड वर्षांची मुलगी आणि धाकटा भाऊ असा परिवार आहे.

Tapendra Singh
मृत - तपेंद्र सिंग

गुरुवारी संध्याकाळी ७.३० च्या सुमारास छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस रेल्वे स्थानकाबाहेरील पादचारी पूल कोसळला. या दुर्घटनेत सुमारे ३६ लोक जखमी झाले, तर ६ जणांना आपले प्राण गमवावे लागले. मृतांमध्ये एक होते वडाळ्याचे रहिवासी तपेंद्र सिंग. ब्रीज दुर्घटनेमध्ये मृत्यूमुखी पडलेले तपेंद्र सिंग वडाळ्यामध्ये वास्तव्याला होते. त्यांच्या लग्नाला फक्त २ वर्षे झाली होती. त्यांच्या पदरी एक दीड वर्षाची लहान मुलगीसुद्धा आहे. तपेंद्र लहान असतानाच त्यांच्या वडिलांचे निधन झाले होते. त्यामुळे अदगी कमी वयातच त्यांच्यावर घराची जबाबदारी येऊन पडली. घरातील मोठा मुलगा असल्यामुळे तपेंद्र यांनी आपल्या आईची आणि लहान भावाची जबाबदारी विनातक्रार स्विकारली आणि पेलवली देखील. दीड वर्षांपूर्वीच त्यांनी लग्न करुन स्वत:चा संसार थाटला होता. दीड वर्षाच्या एक गोंडस मुलीने त्यांचे कुटुंब पूर्ण केले होते.

मात्र, तपेंद्र त्यांच्या सुखी कुटुंबाला नजर लागली असंच म्हणावं लागेल. तिपेंद्र गेल्या ६ ते ८ वर्षांपासून प्रिंटिंग कंपनीमध्ये कामाला होते. नेहमीप्रमाणेच ते गुरुवारी (काल) काम आटोपून घरी निघाले होते. दादाभाई नौरोजी मार्गावरुन तिपेंद्र आले आणि सीएसएमटी स्थानकाला जोडणाऱ्या पुलावरुन ट्रेन पकडण्यासाठी जाऊ लागले. मात्र, सीएसटीएम ब्रीज ओलांडून घरी जात असतानाच काळाने त्यांच्यावर घाला घातला. तपेंद्रच्या मृत्यूची बातमी समजताच त्याच्या भावाने रुग्णालय गाठले. भावाच्या निधनाने त्याला मानसिक धक्का बसला असल्याचं समजतंय. तपेंद्र यांच्या पश्चात त्यांची पत्नी, आई, दीड वर्षांची मुलगी आणि धाकटा भाऊ असा परिवार आहे.

मृत – तपेंद्र सिंग