Mumbai Byculla Fire : भायखळ्यातील मुस्तफा बाग परिसरातील लाकडाच्या गोदामाला भीषण आग

अग्निशमन दलाच्या जवानांना आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं आहे. सध्या कुलिंग ऑपरेशन सुरु करण्यात आलं आहे.

Mumbai Byculla Fire fire broke out in a wooden godown near mustafa bazar in the byculla mumbai
Mumbai Fire : भायखळ्यातील मुस्तफा बाग परिसरातील लाकडी गोदामाला भीषण आग

मुंबईत सोमवारी सकाळी भीषण आगाची घटना समोर आली आहे. भायखळ्यातील मुस्तफा बाग परिसरातील एका लाकडाच्या गोदामाला ही भीषण आग लागली होती. दरम्यान अग्निशमन दलाच्या आठ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. त्यामुळे आग विझवण्यास यश आले आहे. अद्याप या आगीत कोणालाही दुखापत झाल्याची माहिती समोर आलेली नाही. मात्र ही आग नेमकी कशामुळे लागली याचा तपास सुरु आहे. ही आग लेवल २ ची होती अशी माहिती अग्निशमन दलाने दिली आहे.


अग्निशमन दलाच्या आठ गाड्या आणि पाण्याचे टँकर घटनास्थळी पाठवण्यात आले होते. तर घटनास्थळी रुग्णवाहिकाही सज्ज ठेवण्यात आली होती. दरम्यान परिसरात बघ्यांची गर्दी वाढू नये यासाठी पोलीस यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली होती.  मात्र आगीचे कारण अद्याप समजू शकलेले नाही, असे अधिकाऱ्याने सांगितले. दरम्यान भायखळा परिसरातृलाकडी फर्निचरचे मोठे मार्केट आहे. या परिसरातील एका लाकडाच्या गोदामाला आग लागल्याची माहिती आहे. अग्निशमन दलाच्या जवानांना आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं आहे. सध्या कुलिंग ऑपरेशन सुरु करण्यात आलं आहे.


ओमिक्रॉननंतर आता घातक deltacron ची एन्ट्री; या देशात आढळला पहिला रुग्ण