घरमुंबईमुंबईतील भायखळा तुरुंगात महिला कैद्यांना कोरोनाची लागण; ६ मुलांसह ३९ जण पॉझिटिव्ह

मुंबईतील भायखळा तुरुंगात महिला कैद्यांना कोरोनाची लागण; ६ मुलांसह ३९ जण पॉझिटिव्ह

Subscribe

गेल्या दीड वर्षांपासून देशासह राज्यात कोरोनाचा कहर सुरू आहे. अशापरिस्थितीत कोरोनाने पुन्हा एकदा कारागृहात प्रवेश केल्याचे समोर आले आहे. मुंबईतील भायखळा महिला कारागृहात गेल्या दहा दिवसांपासून ३९ कैद्यांना कोरोनाची लागण झाली आहे. यामध्ये सहा लहान मुलांचाही समावेश आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या ३९ जणांपैकी ३६ जणांना जवळच असणाऱ्या एका शाळेत उभारण्यात आलेल्या कोविड सेंटरमध्ये पाठवण्यात आले आहे. तर वयोवृद्ध नागरिकांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सर्व कैद्यांना क्वॉरंटाइन करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. तर, कोरोनाची लागण झालेल्यांमध्ये गर्भवती महिलांचाही समावेश आहे. कोरोनाची लागण झालेल्या गर्भवती महिलांनाही उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

या घडलेल्या घटनेनंतर कारागृहासह आजू-बाजूच्या परिसरात एकच खळबळ उडाली आहे. गेल्या आठवड्यात तुरुगांतील सर्वाची कोरोनाची चाचणी करण्यात आली होती. या दरम्यान कैद्यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आली. हे कैदी कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर त्वरीत बाधित झालेल्या कैद्यांसह संपर्कात आलेल्या अन्य कैद्यांनासुद्धा उपचारासाठी पाठवण्यात आले असल्याची माहिती मिळतेय.

- Advertisement -

तुरुंगाच्या आतमध्ये वेळोवेळी कोरोनाच्या तपासणीचे अभियान राबवले जात आहे. तसेच कैद्यांची कोरोनाची चाचणी नियमित केली जाते. कारण कैद्यांना कोर्टाच्या तारखा आणि रुग्णालयात उपचारासाठी नेले जाते. अशातच बाहेरील व्यक्तींसोबत येणाऱ्या संपर्कामुळे ते संक्रमित होण्याची शक्यता असते. या सर्व गोष्टी लक्षात घेता वेळोवेळी कोरोनाची चाचणी केली जात असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. दरम्यान, मुंबईत गेल्या २४ तासांत ४५४ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर ५८० रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर मुंबईचा रिकव्हरी रेट ९७ टक्के झाला आहे. तर मुंबईत गेल्या २४ तासांत पाच रुग्णाचा मृत्यू झाला आहे.


Harshada Shinkarhttps://www.mymahanagar.com/author/sharshada/
गेल्या ५ वर्षांपासून प्रिंट आणि डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव. लाईफ स्टाईल, फॅशन, महिलांसंबधित विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -