घरमुंबईकोस्टल रोडच्या ३३० मीटर बोगद्याचे काम पूर्ण; महापौर किशोरी पेडणेकर यांनी केली...

कोस्टल रोडच्या ३३० मीटर बोगद्याचे काम पूर्ण; महापौर किशोरी पेडणेकर यांनी केली पाहणी

Subscribe

कोविड तसेच लॉकडाऊनच्या काळातही कोस्टल रोडचे काम वेगाने सुरू असल्याचे महापौरांनी सांगितले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे स्वप्न असलेल्या ‘कोस्टल रोड’चे काम कोरोनाबाबतच्या सर्व नियमांचे पालन करून युद्धपातळीवर सुरू आहे. आतापर्यंत ‘कोस्टल रोड’च्या कामाअंतर्गत ‘मावळा’ टीबीएम मशीनद्वारे बोगदा खोदण्याचे काम ३३० मीटर इतके पूर्ण करण्यात आले आहे. यासंदर्भातील माहिती महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली. महापौरांनी आज कोस्टल रोडच्या कामाच्या ठिकाणी भेट देऊन लोटस जेट्टी, हाजीअली जंक्शन, महालक्ष्मी मंदिराच्या मागील परिसर, अमरसन्सचा परिसरातील कामाची पाहणी केली. कोविड तसेच लॉकडाऊनच्या काळातही कोस्टल रोडचे काम वेगाने सुरू असल्याचे महापौरांनी सांगितले.

पाहणी करणे होते आवश्यक

कोरोनाचा प्रादुर्भाव असताना व लॉकडाऊन लावण्यात आलेला असताना ‘कोस्टल रोड’चे सध्याचे कामकाज कसे सुरू आहे? हे काम निर्धारित वेळेत पूर्ण होत आहे की नाही? याची माहिती घेणे ही आमची जबाबदारी असल्याने आपण या ठिकाणी भेट देऊन पाहणी केली, असे महापौर किशोरी पेडणेकर यांनी सांगितले. तसेच महालक्ष्मी मंदिर परिसरातील रहिवाशांनी त्यांच्या परिसरातील रस्त्याच्या समतोलाबाबत शंका उपस्थित केल्याने याठिकाणी पाहणी करणे आवश्यक होते, असेही महापौरांनी सांगितले. सध्या ‘कोस्टल रोड’च्या कामाअंतर्गत बोगद्याचे काम ३३० मीटर इतके पूर्ण झाले असल्याचे महापौरांनी सांगितले.

- Advertisement -

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -