घरताज्या घडामोडीElectricity Bill: मुंबईकरांचा यंदा विजेच्या बिलाचाही उकाडा वाढणार, विजेच्या मागणीत मोठी वाढ

Electricity Bill: मुंबईकरांचा यंदा विजेच्या बिलाचाही उकाडा वाढणार, विजेच्या मागणीत मोठी वाढ

Subscribe
यंदाच्या उकाड्यात विजेच्या उपकरणांच्या जास्त वापरामुळे विजेच्या मागणीतही वाढ पहायला मिळत आहे. मुंबईची विजेची मागणीही या विजेच्या जास्त वापरामुळे वाढलेली आहे. परिणामी उकाड्याच्या काळात मुंबईकरांना अतिरिक्त विजेच्या बिलाचा बोजा सहन करावा लागू शकतो. यंदा जास्त विजेच्या वापरामुळे मुंबईकरांची विजेचे बिल फुगलेले दिसू शकते असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. महत्वाचे म्हणजे सध्याच्या विजेच्या वापराच्या तुलनेत जास्त वीज वापरल्याने विजेच्या दराचे स्लॅब बदण्याचे संकेत मिळत आहे. परिणामी विजेच्या बिलासाठी जास्त पैसे मोजण्याची वेळ मुंबईकरांवर येणार आहे.
मुंबईसह भारताच्या अनेक भागांमध्ये आपण अभूतपूर्व उष्णतेच्या लाटा अनुभवत आहोत. परिणामी यंदाच्या मार्च आणि एप्रिलमध्येच तापमानात प्रचंड वाढ होत असल्याचे स्पष्ट होते. यामुळे निवासी, औद्योगिक किंवा व्यावसायिक अशा सर्व गटातील ग्राहकांकडून विजेच्या मागणीत वाढ नोंदली जात आहे.

विजेच्या वापराचा ट्रेड हा येत्या मे आणि जूनमध्ये दिसण्याची किंबहुना अधिक गडद होण्याची शक्यता आहे. IPCC (वातावरणीय बदलाबाबतचा आंतर-सरकारी गट) ने, ३५ डिग्री सेल्सिअसहून अधिक तापमान असलेल्या दिवसांची संख्या नजीकच्या भविष्यात २० ते ३० दिवसांनी वाढू शकते. तसेच अधिक उत्सर्जन आणि ग्लोबल वॉर्मिंग स्थितीत ती ४० दिवसांपर्यंतही झेपावू शकते वाढू शकते, असा अंदाज नुकत्याच एका अहवालातून व्यक्त केला आहे.
भारतीय हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, २० एप्रिल रोजी ४२.६ डिग्री सेल्सिअस असे दिवसातील गेल्या पाच वर्षातील सर्वात उष्ण तापमान नोंदले गेले. परिणामी वीज आणि कोळशाची मागणी वेगाने वाढली. मार्चमध्ये राष्ट्रीय सरासरी कमाल तापमान जवळपास ३३.२ डिग्री सेल्सिअसपर्यंत पोहोचले. ते १९०१ पासून याबाबतची माहिती संकलित करणे सुरू केल्यापासूनचे विक्रमी तापमान आहे.

MERC द्वारे अनिवार्य केलेल्या वाढीव टॅरिफ स्लॅब आणि टेलिस्कोपिक दरांकडे ग्राहक वळू शकतात.  बिगर उन्हाळी महिन्यांच्या तुलनेत वीजेचा वापर लक्षणीयरीत्या वाढण्याची शक्यता आहे. देशांतर्गत कोळशाची टंचाई, आयात कोळसा आणि कच्च्या तेलाची वाढलेली किंमत यामुळे वीज खरेदी खर्च वाढला आहे. याचा परिणाम येत्या काही महिन्यांत FAC अंतर्गत लागू होणा-या वीज दरांवर परिणाम होऊ शकतो.

विजेची बचत कशी कराल ?

ग्राहकांकडून विजेचा वापर वाढल्याने त्यांचे देयक (बिल) वाढण्याची शक्यता आहे. गारव्यासाठी मुंबईकरांकडून अधिक प्रमाणात वातानुकूलित उपकरणांचा वापर होण्याचा प्रयत्न होत असल्याने परिणामी विजेचा वापरही वाढत आहे.

- Advertisement -

ग्राहक ५ तारांकित (5 star) मानांकन असलेली उपकरणे वापरू शकतात. अधिक थंडाव्यासाठी एसी सुरू असताना पंखेही वापरू शकतात. वातानुकूलित (एसी) उपकरणांचे तापमान २४ अंशांवर स्थिर ठेवू शकतात. तसेच विजेचा समतोल वापर होण्यासाठी इतर अनेक उपायही योजू शकतात.


Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -