घरदेश-विदेशमध्य रेल्वेची अंबरनाथ- कर्जतदरम्यानची वाहतूक सेवा पूर्ववत

मध्य रेल्वेची अंबरनाथ- कर्जतदरम्यानची वाहतूक सेवा पूर्ववत

Subscribe

कर्जतच्या दिशेने जाणाऱ्या एका लोकलमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने अंबरनाथ ते कर्जतदरम्यानची वाहतूक सेवा विस्कळीत झाली होती. कामावर जाण्याच्या ऐन टाईमिंगवर मध्य रेल्वेची वाहतूक सेवा बिघडल्याने प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. आज सकाळी 7.30 च्या दरम्यान डाऊन मार्गावरील अंबरनाथ आणि बदलापूर दरम्यान S-3 CSMT-कर्जत लोकलमध्ये बिघाड झाला होता. मात्र रेल्वे कर्मचाऱ्यांनी तांत्रिक बिघाड दुरुस्त केला आहे. ज्यानंतर 7.50 वाजता पुन्हा मध्य रेल्वेची वाहतूक सेवा पुर्ववत झाली आहे. मध्य रेल्वेने आपल्या अधिकृत ट्विट अकाऊंटवरून ही माहिती दिली आहे.

मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाल्याने कर्जत, अंबरनाथसह अनेक महत्त्वाच्या सर्वच रेल्वे स्टेशनवर प्रवाशांची मोठ्या प्रमाणावर गर्दी पाहायला मिळत आहे. या बिघाडामुळे प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

- Advertisement -


या बिघाडामुळे सकाळी कर्जतच्या दिशेने जाणारी मध्य रेल्वेची वाहतूक ठप्प झाली. यात अंबरनाथ ते बदलापूरच्या दिशेने जाणारी वाहतूक पूर्णपणे खोळंबली होती. अंबरनाथ स्थानकाजवळ एका लोकलमध्ये हा बिघाड झाला होता. मात्र अचानक झालेल्या बिघाडामुळे प्रवाशांना अडचणी निर्माण झाल्या आहेत.


काँग्रेस अध्यक्ष खरगेंचा मोठा निर्णय; CWC च्या जागी स्थापन करणार नवी समिती

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -