घरताज्या घडामोडीशनिवारी रात्री मुंबई पोलिसांचे ऑपरेशन ऑल आऊट

शनिवारी रात्री मुंबई पोलिसांचे ऑपरेशन ऑल आऊट

Subscribe

३९ फरार आरोपींना अटक, २५९ ठिकाणी कोम्बिंग ऑपरेशन

मुंबई शहरात शनिवारी रात्री उशिरा अचानक मुंबई पोलिसांनी ऑपरेशन ऑल आऊट केले. या कारवाईत पोलिसांनी 39 फरार आरोपींना अटक केली. एकूण 259 ठिकाणी कोम्बिंगऑपरेशन करण्यात आले तर 11 हजार 881 वाहनांची तपासणी करण्यात आली. त्यात 3 हजार 141 वाहनचालकांविरुद्ध कारवाई करण्यात आली असून ड्रंक अ‍ॅण्ड ड्राईव्हप्रकरणी ३१ जणांना अटक करण्यात आली होती. शनिवारी रात्री अकरा ते पहाटे दोन वाजेपर्यंत अचानक मुंबई पोलिसांनी ऑल आऊट ऑपरेशन हाती घेतले.

पाच प्रादेशिक विभागाचे अतिरिक्त पोलीस आयुक्त, तेरा पोलीस उपायुक्त, सहाय्यक पोलीस आयुक्त आणि 93 पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकारी आणि कर्मचार्‍यांनी आपल्या हद्दीत विशेष मोहीम हाती घेतली होती. या कारवाईत पोलिसांनी 223 ठिकाणी कोम्बिंग ऑपरेशन केले, त्यात अभिलेखावरील 1 हजार 278 आरोपी आणि दत्तक योजनेअंतर्गत 1 हजार 561 आरोपी तपासण्यात आले तर 599 आरोपी सापडले. 39 फरारी आरोपींवर अटकेची कारवाई करण्यात आली.

- Advertisement -

ऑल आऊट ऑपरेशनदरम्यान 50 भीक मागणार्‍यांवर कारवाई करण्यात आली. तसेच 505 संवेदनशील ठिकाणाची तपासणी करण्यात आली होती. ड्रग्ज सेवन केल्याप्रकरणी काही आरोपींना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले होते. अवैध शस्त्रे बाळगणार्‍या 37 जणांना अटक करुन त्यांच्याकडून घातक शस्त्रे जप्त करण्यात आली. सर्व पोलीस ठाण्यांच्या हद्दीत 149 ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली होती. त्यात 11 हजार 881 चारचाकी आणि दुचाकी वाहने तपासण्यात आली. मोटार वाहन कायद्यांतर्गत 3 हजार 141 चालकावर तर 185 कलमांतर्गत 31 मद्यपी चालकांवर ड्रंक अ‍ॅण्ड ड्राईव्हप्रकरणी कारवाई करण्यात आली होती.

बेकायदेशीर वास्तव्य करणार्‍यांवर प्रतिबंधात्मक कारवाई म्हणून 951 विविध हॉटेल, लॉज आणि मुसाफिरखाने तपासण्यात आली. 42 अवैध धंद्यांवर छापे टाकून तिथे चालणारे अवैध धंदे बंद करण्यात आले. या कारवाईत पोलिसांनी 71 जणांना अटक केली. 37 तडीपार केलेल्या आरोपीविरुद्ध मपोका कलम 142 अन्वये कारवाई करण्यात आली. महाराष्ट्र पोलीस कायद्याचे कलम 120, 122, 135 अन्वये 90 जणांवर तर 135 फेरीवाल्यांवर कारवाई करण्यात आली. अजामिनपात्र वॉरंटमधील एकूण 176 आरोपींना अटक करुन त्यांना नंतर लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. इतर 98 कारवायांची नोंद झाल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -