घरताज्या घडामोडीमुंबईतील कोरोनाबाधितांचा आकडा ३९ हजार; जाणून घ्या तुमच्या वॉर्डात किती रुग्ण?

मुंबईतील कोरोनाबाधितांचा आकडा ३९ हजार; जाणून घ्या तुमच्या वॉर्डात किती रुग्ण?

Subscribe

मुंबईतील कोरोनाबाधितांचा आकडा ४० हजाराच्या उंबरठ्यावर पोहोचला आहे.

दिवसेंदिवस कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठी वाढ होत आहे. तर राज्यातील मुंबईत सर्वात अधिक रुग्ण आढळून आले असून कोरोनाबाधितांचा आकडा ४० हजाराच्या उंबरठ्यावर पोहोचला आहे. रविवारी दिवसभरात १ हजार २४४ रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे कोरोनाबाधितांची संख्या ३९ हजार ६८६ वर पोहोचली आहे. तर मुंबईत ५२ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तसेच मृतांचा आकडा १ हजार २७९ वर पोहोचला आहे.

मुंबई कोरोनाचा हॉटस्पॉट

मुंबई हा कोरोनाचा हॉटस्पॉट ठरला असून मुंबईच्या धारावी परिसरात कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहेत. तर मुंबईतील जवळपास सहा वॉर्डात जवळपास २ हजारपेक्षा जास्त कोरोनाचे रुग्ण आहेत. यात धारावी, माहिम, माटुंगा, दादर या परिसरांसह इतर परिसरांचा देखील समावेश आहे.

- Advertisement -

२ हजारपेक्षा जास्त रुग्ण असलेले वॉर्ड

  • जी उत्तर वॉर्ड – धारावी, माहीम, दादर : २७२८
  • ई वॉर्ड – भायखळा, नागपाडा, माझगाव : २४३८
  • एफ उत्तर वॉर्ड – माटुंगा किंग सर्कल : २३७७
  • एल वॉर्ड – कुर्ला : २३२१
  • एच पूर्व वॉर्ड – बांद्रा, सांताक्रुझ पूर्व : २०९४
  • के पश्चिम वॉर्ड – अंधेरी पश्चिम : २०४९

तर २ हजारपेक्षा कमी रुग्ण असलेले वॉर्ड

  • जी दक्षिण – वरळी, प्रभादेवी, एल्फिन्स्टन : १९०५
  • के पूर्व – अंधेरी पूर्व : १८७५
  • एम पूर्व – गोवंडी, मानखुर्द : १६९६
  • एफ दक्षिण – परेल दादर पूर्व : १६४८
  • एन वॉर्ड – घाटकोपर : १५२५
  • एस वॉर्ड – विक्रोळी, भांडुप नाहूर : १२७८
  • आर उत्तर – दहिसर : ३०९

हेही वाचा – राज्यात मिशन बिगीन अगेन तीन टप्प्यात निर्बंध हटवणार


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -