मुंबईत कोरोनावर उपचार घेणारे ९६ टक्के रूग्ण लस न घेतलेले – महापालिका आयुक्त

मुंबई महापालिका सद्यस्थितीला कोरोनाची परिस्थिती हाताळण्यासाठी पूर्णपणे सज्ज असल्याचाही महापालिका अधिकाऱ्यांचा विश्वास आहे. मुंबईत कोरोनाचे १ लाख कोरोनाचे रूग्ण वाढले तरीही ऑक्सिजनची गरज ही १० टन इतकीच असेल. तर आपली ऑक्सिजन निर्मितीची क्षमता ही २०० टन प्रतिदिन इतकी आहे. त्यामुळेच मुंबईच्या गरजेपेक्षा आपल्याकडे ४०० टन ऑक्सिजन स्टोरेजच्या रूपात आहे. त्यामुळेच तिसऱ्या लाटेमध्ये ऑक्सिजनची गरज वाढण्यापेक्षा आयसीयू आणि एकूणच बेडच्या संख्येत वाढ होण्याची संख्या आहे असेही ते म्हणाले.

Mumbai Lockdown Heavy rush in mumbai local train

मुंबईतील कोरोना रूग्णांचा आकडा हा दररोज नवनवीन रेकॉर्ड करत आहे. पण अशा वाढत्या कोरोना रूग्णांच्या आकडेवारीतच एक गंभीर बाब समरो आली आहे. मुंबई कोरोनाच्या संसर्गामुळे उपचारासाठी दाखल झालेल्या रूग्णांमध्ये काही जणांना सध्या ऑक्सिजनची गरज भासत आहे. ही ऑक्सिजनची गरज भासणाऱ्या रूग्णांमध्ये ज्या व्यक्तींचे कोरोनाविरोधी लसीकरण झाले नाही, अशा रूग्णांचा समावेश असल्याची माहिती मुंबईचे महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी दिली आहे. मुंबईत मोठ्या प्रमाणात लसीकरण झाल्यामुळेच कोरोनाचा संसर्ग अधिक झाला नाही, असेही ते म्हणाले.

मुंबईत १९०० कोरोना रूग्ण हे ऑक्सिजन बेड्सवर आहेत. त्यापैकी ९६ टक्के रूग्णांचे कोरोनाविरोधी लसीकरण झालेले नाही. अवघ्या ४ टक्के रूग्णांनीच लस घेतल्याचे निष्पन्न झाले आहे. मुंबई महापालिकेचे आयुक्त चहल यांनीच ही आकडेवारी हिंदुस्तान टाईम्सशी बोलताना स्पष्ट केली. खाजगी शाळांचे समन्वयक असलेले बॉम्बे हॉस्पिटलचे डॉ भन्साली म्हणाले की, ऑक्सिजन बेडची गरज ही सध्या लसीकरण न झालेल्या रूग्णांना अधिक भासत असल्याचे त्यांनी सांगितले. हे रूग्ण ४० ते ५० वयोगटातील आहेत. त्यामुळेच प्रत्येक व्यक्तीने लसीकरण पूर्ण गरजेचे असल्याचे ते म्हणाले.

लसीकरण पूर्ण न झालेल्या व्यक्तींनाच हॉस्पिटलमध्ये उपचाराची गरज भासत असल्याची माहिती टास्क फोर्सचे सदस्य डॉ ओम श्रीवास्तव यांनी दिली. सध्या उपचाराची गरज असलेल्या रूग्णांमध्ये लसीकरण पूर्ण न केलेले रूग्ण असल्याचे त्यांनी सांगितले. कोरोनाच्या रूग्णसंख्येत वाढ झाल्यानंतर अनेक रूग्ण हे लसीकरणासाठी धावाधाव करत असल्याची माहिती त्यांनी दिली. कोरोनाचा संसर्ग झालेल्या रूग्णांमध्ये लस न घेतलेल्या रूग्णांना ऑक्सिजन सपोर्टसोबतच आयसीयू उपचाराची गरज भासत असल्याचेही ते म्हणाले. ओमिक्रॉनचा संसर्ग झालेल्या रूग्णांमध्ये श्वसनाच्या संबंधित भागावर अधिक परिणाम होत आहे त्यामुळेच ओमिक्रॉनचा संसर्ग झालेल्या रूग्णांमध्ये ऑक्सिजनची गरज अधिक भासणार नाही, असेही ते म्हणाले. ओमिक्रॉनची स्पष्टता ही फक्त जिनोम सिक्वेन्सिंगच्या माध्यमातून येत असल्याने अनेक हॉस्पिटलने RT-PCR चाचणीतून या संसर्गाची पडताळणी करण्यासाठी S-gene ड्रॉपआऊट निकष वापरायला सुरूवात केली आहे.

दोन्ही संसर्गाचीही शक्यता 

अनेक रूग्णांना डेल्टा आणि ओमिक्रॉन या दोन्ही संसर्गाची भीतीही डॉ श्रीवास्तव यांनी बोलून दाखवली आहे. वारंवार या संसर्गाच्या संपर्कात आल्यानेच ही लागण होत असल्याची शक्यता त्यांनी बोलून दाखवली. पण आपल्याकडे ही गोष्ट सिद्ध करण्यासाठी कोणताही जिनोम सिक्वेन्सिंगचा डेटा नाही. पण ही बाब लक्षात घेणे गरजेचे असल्याचेही ते म्हणाले.

मुंबईची ऑक्सिजनची गरज

मुंबई महापालिका सद्यस्थितीला कोरोनाची परिस्थिती हाताळण्यासाठी पूर्णपणे सज्ज असल्याचाही महापालिका अधिकाऱ्यांचा विश्वास आहे. मुंबईत कोरोनाचे १ लाख कोरोनाचे रूग्ण वाढले तरीही ऑक्सिजनची गरज ही १० टन इतकीच असेल. तर आपली ऑक्सिजन निर्मितीची क्षमता ही २०० टन प्रतिदिन इतकी आहे. त्यामुळेच मुंबईच्या गरजेपेक्षा आपल्याकडे ४०० टन ऑक्सिजन स्टोरेजच्या रूपात आहे. त्यामुळेच तिसऱ्या लाटेमध्ये ऑक्सिजनची गरज वाढण्यापेक्षा आयसीयू आणि एकूणच बेडच्या संख्येत वाढ होण्याची संख्या आहे असेही ते म्हणाले. मुंबईतील ८० टक्के कोविड बेड्स सद्यस्थितीला रिकामी आहेत. त्यामुळेच ही बेड्सची संख्या ५० टक्के गाठल्यास परिस्थितीचा आढावा घेण्यात येईल असेही चहल म्हणाले. तज्ज्ञांच्या अंदाजानुसार मुंबईत ४० हजार रूग्ण आढळू शकतात. ही रूग्णसंख्येतील वाढ दिसू शकते अथवा ही आकडेवारी पोहचणारही नाही. पण आपण तिसऱ्या लाटेतील परिस्थितीत सुरक्षितपणे बाहेर पडू असा विश्वास चहल यांनी व्यक्त केला.