घरCORONA UPDATEमुंबईत कोरोनाचा रिव्हर्स गिअर! मृतांसोबतच कंटेनमेंट झोन, सीलबंद इमारती घटल्या!

मुंबईत कोरोनाचा रिव्हर्स गिअर! मृतांसोबतच कंटेनमेंट झोन, सीलबंद इमारती घटल्या!

Subscribe

मुंबईत सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत आहे. कोरोनासंदर्भातील काल आणि आजच्या अशा दोन दिवसांच्या अहवालाचा तुलनात्मक अभ्यास केल्यास झोपडपट्टया आणि चाळीतील कंटेन्मेंट झोनची संख्या २८३ वरून २२१ एवढी झाली आहे. म्हणजेच त्यामध्ये ६२ ने घट झाली आहे. तर सीलबंद इमारतींची संख्या २,४६२ वरून २०९० एवढी झाली आहे. म्हणजेच त्यामध्ये ३७३ ने घट झाली आहे. तसेच, कोरोनामुळे काल ७ जणांचा मृत्यू झाला होता तर आजच्या अहवालात केवळ ३ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे मृतांच्या संख्येत ४ ने घट झाली आहे. तर कोरोनामुळे आतापर्यंत मृत पावलेल्या रुग्णांची एकूण संख्या ११,१३२ वरून ११,१३५ एवढी झाली आहे.

गेल्या २४ तासांत शहर आणि उपनगरात ५९२ जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. तर आतापर्यंत कोरोनाची बाधा झालेल्या रुग्णांची एकूण संख्या २ लाख ९४ हजार ६५९ एवढी आहे. तसेच, दिवसभरात कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या ६९५ एवढी झाली आहे. तर आतापर्यंत कोरोनामुक्त झालेल्या एकूण रुग्णांची संख्या २ लाख ७४ हजार ७६७ एवढी झाली आहे.

- Advertisement -

कालपर्यंत कोरोनाच्या चाचण्यांची संख्या २३ लाख ८२ हजार ४२० एवढी होती. त्यात दिवसभरातील ११,१७० चाचण्यांची भर पडली असून आता एकूण चाचण्यांची संख्या २४ लाख ९३ हजार ५९० एवढी झाली आहे.


हेही वाचा – Corona Update : मुंबईची रेकॉर्डब्रेक कामगिरी! दिवसभरात कोरोनाचे फक्त ३ मृत्यू!
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -