कोरोनाच्या संसर्गाचे प्रमाण वाढत असचानाच मुंबईतील कोरोनाच्या संसर्गाचा सर्वाधिक आकड्याचा कालावधीत टाटा इंस्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च (TIFR)ने सांगितले आहे. कोरोनाच्या संसर्गाचा सर्वाधिक आकडा (Peak Period) कोणत्या कालावधीत असेल तसेच ही आकडेवारी ओसरण्यासाठी कझी सुरूवात होईल, याबाबतची माहितीही त्यांनी दिली आहे. तर कोरोनामुळे सर्वाधिक मृत्यू कोणत्या कालावधीत होतील याबाबतचा खुलासाही टीआय़एफआरच्या वैज्ञानिकाने केला आहे. टीआयएफआरचे कॉम्प्युटर सायन्स विभागाचे वैज्ञानिक आणि वरिष्ठ प्राध्यापक संदीप जुनेजा यांनी ही माहिती दिली आहे.
कोरोनाचा मुंबईतील पीक कालावधी हा ६ जानेवारी ते १३ जानेवारी या कालावधीत असेल असी माहिती जुनेजा यांनी दिली आहे. तर कोरोनाचा पिक कालावधी नॉर्मल होण्यासाठी महिन्याभराचा कालावधी लागेल असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. पण फेब्रुवारी महिन्यात सर्वाधिक कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूचा आकडा येईल असेही त्यांनी सांगितले. पण दुसऱ्या लाटेच्या तुलनेत हे मृत्यू ३० टक्के ते ५० टक्के कमी असतील असाही अंदाज त्यांना मांडला आहे. मुंबईत मंगळवारी कोरोना रूग्णांचा आकडा हा १० हजार ८६० इतका समोर आला आहे. ७ एप्रिल २०२१ नंतर ही आकडेवारी पहिल्यांदाच इतक्या मोठ्या प्रमाणात वाढल्याचे समोर आले आहे. जुनेजा हे covid-19 मॉडेलवर काम केले आहे. त्यानुसारच ही आकडेवारी सांगण्यात आली आहे.
त्याचवेळी मुंबईतील हॉस्पिटल दुसऱ्या लाटेसारखी भरगच्च असणार नाहीत, असेही त्यांनी म्हटले आहे. वैद्यकीय सुविधा आणि ऑक्सिजन सुविधांच्या माध्यमातून यंदाच्या लाटेवर नियंत्रण मिळवता येईल, असेही मत त्यांनी मांडले. संदीप जुनेजा यांनी पहिल्या आणि दुसऱ्या लाटेचा अंदाज घेऊनच हे मॉडेल विकसित केले आहे. ओमिक्रॉन व्हेरीएंटचा सिम्युलेटरमध्ये वापर करूनच हे मॉडेल विकसित करण्यात आले आहे. साधारणपणे ५० टक्के ते ७० टक्के नागरिकांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्याची वेळ येईल.
तिसऱ्या लाटेत किती मृत्यू ?
कोरोना रूग्णांमध्ये मृत्यूचा आकडा हा ३० टक्के ते ५० टक्के इतका असेल. एकाच दिवशी सर्वाधिक ९० लोकांचा मृत्यू हा दुसऱ्या कोरोना लाटेचा निकष ग्राह्य धरण्यात आल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. ज्या नागरिकांनी लसीकरण पूर्ण केले आहे, अशा नागरिकांचा लसीकरणाचा धोका हा ७० टक्क्यांनी कमी झाल्याचेही त्यांनी मॉडेलमध्ये म्हटले आहे. तर लसीकरण पूर्ण झालेले ५५ टक्के लोकांना संसर्गाची लागण होणार नाही हीदेखील या मॉडेलमधील शक्यता आहे. तर २० टक्के लोकांमध्ये ओमिक्रॉनची लक्षणे दिसतील असाही अंदाज वर्तवण्यात आला आहे.