Mumbai Corona Update : मुंबईत 1 हजार 160 नव्या कोरोनाबाधितांची नोंद ; 10 जणांचा मृत्यू

मुंबईत कोरोनाच्या रुग्णसंख्येत गेल्या काही दिवसांपासून घसरण झाल्याचे पाहायला मिळत आहे. आज रविवारी 30 जानेवारीला दिवसभरात 1 हजार 160 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. मुंबईत 20 हजारांवर पार करण्यात आलेली रुग्णसंख्या आता एक हजारांच्या आसपास जाऊन पोहोचली आहे. काल शनिवारी कोरोनबाधितांची रुग्णसंख्या ही 1 हजार 411 इतकी होती. आज ही संख्या कमी झालेली पाहायला मिळत आहे.

maharashtra corona update patients 222 discharged today 149 new cases in the state today
Corona Update : राज्यात कोरोनाच्या नव्या रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण अधिक; 149 नवे रुग्ण, 222 कोरोनामुक्त

मुंबईत कोरोनाच्या रुग्णसंख्येत गेल्या काही दिवसांपासून घसरण झाल्याचे पाहायला मिळत आहे. आज रविवारी 30 जानेवारीला दिवसभरात 1 हजार 160 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. मुंबईत 20 हजारांवर पार करण्यात आलेली रुग्णसंख्या आता एक हजारांच्या आसपास जाऊन पोहोचली आहे. काल शनिवारी कोरोनबाधितांची रुग्णसंख्या ही 1 हजार 411 इतकी होती. आज ही संख्या कमी झालेली पाहायला मिळत आहे. मुंबईत आतापर्यंत बरे झालेल्या रुग्णांची संख्या 1 लाख 15 हजार 451 इतके आहेत. याशिवाय मुंबईत आतापर्यंत नोंदवण्यात आलेल्या कोरोना रुग्णांची संख्या 1 लाख 45 हजार 630 इतकी आहे.

आज मुंबईत एकूण 46 हजार 307 इतक्या कोरोनाच्या चाचण्या करण्यात आल्या असून, त्यापैकी 1 हजार 160 कोरोना चाचण्या पॉझिटीव्ह आल्या आहेत. आज रविवारी मुंबईत 1० रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. काल हीच संख्या 11 इतकी होती. मुंबईत आतापर्यंत मृत्यूसंख्या 16 हजार 612 इतकी झाली आहे. मुंबईत आज कोरोना पॉझिटीव्ह आलेल्या रुग्णांपैकी एकूण 160 रुग्ण उपचारांसाठी रुग्णालयात दाखल झाले आहेत. यातील केवल 29 रुग्ण व्हेंटिलेटर असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. मुंबईत 23 जानेवारी पासून 29 जानेवारीपर्यंतचा विचार केला असता मुंबईतील कोरोना रुग्णवाढीचा दर हा 0.18 टक्के इतका आहे. मुंबईतील एकूण बरे झालेल्या रुग्णांचा दर 97 टक्के इतका आहे.


मुंबईत सध्या 1० हजार 797 सक्रिय कोरोना रुग्ण आहेत. त्याचप्रमाणे 8 सक्रीय सीलबंद इमारती असून मुंबईत सध्या एकही कंटेनमेंट झोन नाही.


हे ही वाचा – Corona : कोरोनाची तिसरी लाट मार्चमध्ये ओसरणार ; आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती