घरCORONA UPDATEMumbai Corona Update:मुंबईत आज १ हजार ७६६ रुग्ण कोरोनामुक्त, २९ हजारांहून अधिक...

Mumbai Corona Update:मुंबईत आज १ हजार ७६६ रुग्ण कोरोनामुक्त, २९ हजारांहून अधिक अँक्टिव रुग्ण

Subscribe

मुंबईत आज १ हजार ४१६ नव्या कोरोना रुग्णांची नोंद

मुंबईतील रुग्णसंख्या आज काही अंशी पुन्हा वाढली आहे. मुंबईत गेल्या २४ तासात ३३ हजार ७८ कोरोना चाचण्या करण्यात आल्या. त्यातील १ हजार ४१६ चाचण्या पॉझिटिव्ह आल्या आहेत. त्यामुळे मुंबईत आज १ हजार ४१६ नव्या कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. कालच्या तुलनेत आज मुंबईची रुग्णसंख्या काही अंशी कमी झाली आहे. आज मुंबईतील कोरोनामुक्तांच्या संख्येतही थोड्या प्रमाणात वाढ झालेली पहायला मिळाली आहे. मुंबईत आज १ हजार ७६६ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. मुंबईत आतापर्यंत बरे झालेल्या रुग्णांची संख्या ६४ लाख ९ हजार ८९ इतकी झाली आहे. मुंबईत सध्या २९ हजार १०३ अँक्टिव्ह रुग्ण आहेत.


मुंबईत १४ मे ते २० मे पर्यंतचा विचार केला असता मुंबईत कोरोना रुग्णवाढीचा दर हा ०.२२ टक्के इतका आहे. तर मुंबईत आज ५४ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. काल मृत्यूचा हाच आकडा ५९ इतका होता. मुंबईचा रिकव्हरी रेट हा अद्याप ९३ टक्के इतका आहे. मुंबईतील कंटेनमेंट झोनची संख्याही कमी झाली आहे. मुंबईत सध्या ६९ सक्रिय कंटेनमेंट झोन आहेत तर २७३ सक्रिय सील बंद इमारती आहेत.

- Advertisement -

मुंबईत सध्या मुंबईत सध्या २९ हजार १०३ अँक्टिव्ह रुग्ण आहेत. तर ठाण्यात सध्या २६ हजार २४८ अँक्टिव्ह रुग्ण आहेत. त्याचप्रमाणे पुण्यात ५८ हजार ८४० तर रायगडमध्ये सध्या ६ हजा ३३१ अँक्टिव्ह रुग्ण आहेत. तर राज्यात आज २९ हजार ६४४ नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली असून राज्यात सध्या ३ लाख ६७ हजार १२१ अँक्टिव्ह रुग्ण आहेत.


हेही वाचा – Maharashtra Corona Update: राज्यात २४ तासांत २९,६४४ नव्या रुग्णांची वाढ, ५५५ जणांचा मृत्यू

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -