Thursday, August 5, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर CORONA UPDATE Mumbai Corona Update : मुंबईत २४ तासात १० कोरोना रुग्णांचा मृत्यू, ५००...

Mumbai Corona Update : मुंबईत २४ तासात १० कोरोना रुग्णांचा मृत्यू, ५०० रुग्णांची कोरोनावर मात

मुंबईत आतापर्यंत एकूण १५ हजार ७४९ कोरोना रुग्णांचा मृत्यू

Related Story

- Advertisement -

मुंबईत कोरोना रुग्णांच्या संख्येत घट झाली आहे. सध्या मुंबईत मागील २४ तासात ५ हजार ८९७ कोरोना रुग्णांवर उपचार सुरु आहेत. मुंबईतील कोरोना रुग्णांची संख्येमध्ये घट झाला असल्याने मुंबईकरांना चांगला दिलासा मिळाला आहे. मुंबईत मागील २४ तासात ३९२ कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. आतापर्यंत मुंबई पालिका क्षेत्रात ७ लाख ३२ हजार ७४१ कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर ५०२ कोरोना रुग्णांनी मागील २४ तासात मात केली आहे. कोरोनाची दुसरी लाट ओसरली असली तरी पुढील महिन्यात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता तज्ञांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

मुंबईत आतापर्यंत एकूण १५ हजार ७४९ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर मागील २४ तासात १० रुग्णांचा मृत्यू झाल आहे. आतापर्यंत एकूण ७ लाख ८ हजार ७१६ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. मुंबईत एकूण ७७ लाख ७१ हजार ५७७ कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत. यामध्ये मागील २४ तासात ३० हजार ५०९ कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत. मृत्यू झालेल्या रुग्णांपैकी ६ रुग्णांना काही दीर्घकालीन आजार होते. ६ रुग्ण पुरुष व ४ रुग्ण महिला होते. ८ रुग्णांचे वय ६० वर्षा वर होते. उर्वरित २ रुग्ण ४० ते ६० वयोगटामधील होते.

- Advertisement -

मुंबई जिल्ह्यातील बरे झालेल्या रुग्णांचा दर ९७ टक्क्यांवर गेला आहे. १५ जुलै ते २१ जुलै २०२१ पर्यंत मुंबईतील एकूण कोविड वाढीचा दर ०.०६ टक्के आहे. तर मुंबईतील दुप्पटीचा दर ११५२ दिवसांवर गेला आहे. मुंबईतील कंटेनमेंट झोनची संख्या कमी झाली असून ५ वर आली आहे. तर सक्रिय सीलबंद इमारतींची संख्या ६२ वर आली आहे.

- Advertisement -