घरCORONA UPDATEMumbai Corona Update: दिलासादायक! मुंबईतील दुप्पटीचा दर वाढला, चारशेच्या उंबरठ्यावर

Mumbai Corona Update: दिलासादायक! मुंबईतील दुप्पटीचा दर वाढला, चारशेच्या उंबरठ्यावर

Subscribe

मुंबईत कोरोनाचे प्रमाण कमी होताना दिसत आहे. मुंबईतील कोरोनाचा दुप्पटीचा दर वाढला असून चारशेच्या उंबरठ्यावर आहे. गेल्या २४ तासांत मुंबईत १ हजार ४८ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून २५ जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. तर १ हजार ३५९ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. मुंबईतील एकूण कोरोनाबाधितांची संख्या ७ लाख ४ हजार ५०९वर पोहोचली आहे. यापैकी आतापर्यंत १४ हजार ८३३ जणांचा मृत्यू झाला असून ६ लाख ५९ हजार ८९९ जण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या मुंबईत २७ हजार ६१७ जणांवर उपचार सुरू आहेत.

- Advertisement -

मुंबईत आज दिवसभरात २६ हजार ७५१ कोरोना चाचण्या झाल्या असून आजपर्यंत ६२ लाख २९ हजार ३३० चाचण्या झाल्या आहेत. आज मृत्यू झालेल्या २५ रुग्णांपैकी १५ रुग्णांना काही दीर्घकालीन आजार होते. यामध्ये १५ रुग्ण पुरुष आणि १० रुग्ण महिल्या होत्या. ३ रुग्णांचे वय ४० वर्षा खाली होते. तर १३ रुग्णांचे वय ६० वर्षांवर होते आणि उर्वरित ९ रुग्ण ४० ते ६० वयोगटातील होते.

मुंबई जिल्ह्यातील बरे झालेल्या रुग्णांचा दर ९४ टक्के झाला असून २२ मे ते २८ मे २०२१ पर्यंत मुंबईतील एकूण कोविड वाढीचा दर ०.१७ टक्के झाला आहे. तसेच मुंबईतील दुप्पटीचा दर ३९९ दिवसांवर गेला आहे. सध्या मुंबईत ४० सक्रिय कंटेनमेंट झोन आहेत. तर १७२ सक्रिय सीलबंद इमारती आहेत.

- Advertisement -

हेही वाचा – PM CARES: कोरोनामुळे अनाथ झालेल्या मुलांना मोदी सरकार देणार मोफत शिक्षण आणि मासिक भत्ता


 

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -