Friday, April 16, 2021
27 C
Mumbai
घर CORONA UPDATE Mumbai Corona Update: मुंबईत कोरोनाचा उद्रेक! कोरोना रुग्णसंख्येचा नवा उच्चांक

Mumbai Corona Update: मुंबईत कोरोनाचा उद्रेक! कोरोना रुग्णसंख्येचा नवा उच्चांक

Related Story

- Advertisement -

देशाच्या आर्थिक राजधानी मुंबईत कोरोना विषाणूने थैमान घातले आहे. मुंबईत दिवसागणिक कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. आज दिवसभरात मुंबईत नव्या कोरोनाबाधितांच्या संख्येत उच्चांकी वाढ झाली आहे. गेल्या २४ तासांत ११ हजार १६३ रुग्णांची वाढ झाली असून २५ जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे मुंबईतील एकूण कोरोनाबाधितांची संख्या ४ लाख ५२ हजार ४४५वर पोहोचली आहे. यापैकी आतापर्यंत ११ हजार ७७६ जणांचा मृत्यू झाला आहे.

- Advertisement -

मुंबईत आज दिवसभरात ५ हजार २६३ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून आतापर्यंत ३ लाख ७१ हजार ६२८ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तसेच सध्या ६८ हजार ५२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. कोरोनाबाधितांची वाढती संख्या पाहून कोरोनाचा चाचणींवर अधिक भर देण्यात आला आहे. आज दिवसभरात मुंबई ५१ हजर ३१९ जणांच्या कोरोना चाचण्या झाल्या आहेत. आतापर्यंत ४२ लाख ६९ हजार १७५ कोरोना चाचण्या झाल्या आहे.

सध्या मुंबईतील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८२ टक्के इतके आहे. २८ मार्च ते ३ एप्रिलपर्यंत मुंबईतील एकूण कोरोना वाढीचा दर १.६१ टक्के आहे. तर दुप्पटीचा दर ४२ दिवस आहे. सध्या सक्रिय कंटेनमेंट झोन ७४ असून ७०० सीलबंद इमारती आहेत.

मुंबईत काय असणार निर्बंध?

  • बस आणि लोकलमध्ये जितकी आसन क्षमता आहे, तितक्याच संख्येने प्रवास करता येणार आहे.
  • रिक्षामध्ये चालकसह फक्त दोन व्यक्तींना प्रवास करण्याची परवानगी
  • अत्यावश्यक सेवेतील लोकांनाच गाडी चालवण्याची परवानगी
  • सिनेमागृह, नाट्यगृह, मैदाने पूर्णपणे बंद राहणार
  • बाजारपेठांमध्ये मर्यादित लोकांना सोडणार

- Advertisement -

हेही वाचा – आता राज्यात मिशन बिगीन अगेन ऐवजी ‘ब्रेक दि चेन’, वाचा नवी नियमावली


 

- Advertisement -