घरताज्या घडामोडीMumbai Corona Update: मुंबईत गेल्या २४ तासांत १,१२८ नव्या रुग्णांची वाढ, १०...

Mumbai Corona Update: मुंबईत गेल्या २४ तासांत १,१२८ नव्या रुग्णांची वाढ, १० जणांचा मृत्यू

Subscribe

मुंबईतील बरे झालेल्या रुग्णांचा दर ९७ टक्क्यांवर पोहोचला आहे. तर रुग्ण दुप्पटीचा दर ५७० दिवस झाला आहे.

राज्यातील इतर शहर आणि जिल्ह्याच्या तुलनेत मुंबईत नव्या कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात घट होताना दिसत आहे. तसेच नव्या कोरोनाबाधितांच्या संख्येपेक्षा रुग्ण बरे होण्याचे प्रमाण अधिक आहे. मुंबईत गेल्या दोन दिवसांपासून १ हजारापेक्षा कमी नव्या रुग्णांची नोंद होत होती. मात्र आज मुंबईत १ हजार १२८ नव्या कोरोनाबाधितांची वाढ झाली असून १० जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. तर १ हजार ८३८ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. सध्या मुंबईत ८ हजार १५८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

मुंबईत आज आढळलेल्या एकूण रुग्णांपैकी ९९३ रुग्ण एसिम्प्टोमॅटिक आहेत. तसेच १०८ रुग्ण रुग्णालयात दाखल झाले आहेत. आज दिवसभरात मुंबईत ४६ हजार ७३ कोरोना चाचण्या झाल्या असून आतापर्यंत १ कोटी ५३ लाख ८७ हजार ६ चाचण्या झाल्या आहेत. मुंबईतील एकूण कोरोनाबाधितांची संख्या १० लाख ४८ हजार ५२१वर पोहोचली आहे. यापैकी आतापर्यंत १६ हजार ६४० जणांचा मृत्यू झाला असून १० लाख २० हजार ९२६ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

- Advertisement -

आज मृत्यू झालेल्या १० रुग्णांना काही दीर्घकालीन आजार होते. त्यामधील ८ रुग्ण पुरुष आणि २ रुग्ण महिला होत्या. ९ रुग्णांचे वय ६० वर्षावरील होते. तर उर्वरित रुग्ण ४० ते ६० वयोगटातील होते. दरम्यान मुंबईतील बरे झालेल्या रुग्णांचा दर ९७ टक्क्यांवर पोहोचला आहे. तर रुग्ण दुप्पटीचा दर ५७० दिवस झाला आहे. मुंबईतील सक्रिय सीलबंद इमारती ४ आहेत.


हेही वाचा – Corona Vaccine: बनारसमध्ये मिळाल्या नकली कोरोना लस आणि चाचणी किट; अनेक राज्यांमध्ये होणार होता पुरवठा


Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -