Mumbai corona Update: मुंबईत शुक्रवारी १,२९७ रुग्ण कोरोनामुक्त, मृत्यूचा आकडा आजही स्थिर

मुंबईचा २८ जानेवारी ते ३ फेब्रुवारी पर्यंतचा विचार केला असता मुंबईचा पॉझिटिव्हीटी रेट हा ०.१० टक्के इतका आहे. तर पॉझिटिव्हीटी रेट हा ९७ टक्के इतका आहे

मुंबईतील कोरोना रुग्णांची तीन अंकी रुग्णसंख्या सध्या नोंदवण्यात येत आहे. आज मुंबईतील रुग्णांची संख्या काही फरकाने वाढली आहे. गेल्या २४ तासात मुंबईत ८४६ नव्या बाधित रुग्णांची नोंद करण्यात आली. तर आज १ हजार २९७ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. मुंबईत आतापर्यंत कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या १ लाख २३ हजार ५८९ इतकी आहे. मुंबईतील कोरोना आकडेवारीचा उतरत्या आलेखामुळे मुंबईकरांना दिलासा मिळाला आहे.

मुंबईत आज ४४ हजार ३२३ कोरोना चाचण्या करण्यात आल्या त्यातील ८४६ चाचण्या पॉझिटीव्ह आल्या आहेत. आज नोंद करण्यात आलेल्या रुग्णांपैकी १११ रुग्ण उपचारांसाठी रुग्णालयात दाखल झाले आहेत तर त्यातील २६ रुग्णांना ऑक्सिजन बेडवर ठेवण्यात आले आहे. मुंबईत कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत रुग्णालयात दाखल झालेल्या एकूण रुग्णांची संख्या ही १ हजार ६९१ इतकी आहे. बाधित रुग्णांपैकी फार कमी रुग्णांना रुग्णालयात जाऊन उपचार घेण्याची गरज भासत आहे.

मुंबईतील मृत्यूचा आकडा गेल्या दोन दिवसांपासून स्थिर असून आज शुक्रवारी मुंबई ७ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. मागील दोन दिवसांपासून हा आकडा स्थिर असल्याचे पहायला मिळत आहे. मुंबईचा २८ जानेवारी ते ३ फेब्रुवारी पर्यंतचा विचार केला असता मुंबईचा पॉझिटिव्हीटी रेट हा ०.१० टक्के इतका आहे. तर पॉझिटिव्हीटी रेट हा ९७ टक्के इतका झाला आहे. मुंबईत सध्या ३ सक्रीय सीलबंद इमारती आहेत.


हेही वाचा –  Maharashtra Corona Update: सलग दुसऱ्या दिवशी राज्यात एकही Omicron रुग्ण नाही, कोरोनाबाधित…