Mumbai Corona Update: मुंबईत शनिवारी 1,411 नव्या कोरोना रुग्णांची नोंद, 11 जणांचा मृत्यू

आज शनिवारी मुंबईत 11 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. काल हीच संख्या 10 इतकी होती. मुंबईत आतापर्यंत मृत्यूसंख्या 16 हजार 602 इतकी झाली आहे.

Mumbai Corona Update 1,411 new corona patients registered in Mumbai on Saturday, 11 died
Mumbai Corona Update: मुंबईत शनिवारी 1,411 नव्या कोरोना रुग्णांची नोंद, 11 जणांचा मृत्यू

मुंबईत 20 हजारांच्या पार गेलेली कोरोना रुग्णांची संख्या आता  एक हजारांवर आली आहे. मुंबईत गेल्या काही दिवसांपासून कोरोन रुग्णांचा संख्येत घसरण होत असून आजही रुग्णसंख्या कमी झाली आहे. मुंबईत आज 1,411 नव्या कोरोना बाधित रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. काल हीच संख्या 1,312 वर होती. आज ही संख्या शंभरने वाढली आहे. मुंबईत आतापर्यंत नोंदवण्यात आलेली कोरोना रुग्णांची संख्या 1 लाख 44 हजार 470 इतकी झाली आहे. मुंबईत आज 38,965 कोरोना चाचण्या करण्यात आल्या त्यातील 1,411 कोरोना चाचण्या पॉझिटीव्ह आल्या आहेत.

मुंबईतील कोरोना मृत्यूदर हा आधीपासूनच कमी होता. आज शनिवारी मुंबईत 11 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. काल हीच संख्या 10 इतकी होती. मुंबईत आतापर्यंत मृत्यूसंख्या 16 हजार 602 इतकी झाली आहे. मुंबईत आज कोरोना पॉझिटीव्ह आलेल्या रुग्णांपैकी एकूण 187 रुग्ण उपचारांसाठी रुग्णालयात दाखल झाले आहेत. यातील केवल 43 रुग्ण व्हेंटिलेटर असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. मुंबईत 22 जानेवारी पासून 28 जानेवारीपर्यंतचा विचार केला असता मुंबईतील कोरोना रुग्णवाढीचा दर हा 0.21टक्के इतका आहे.

त्याचप्रमाणे मुंबईत कोरोनावर मात करणाऱ्या रुग्णांचे प्रमाण देखील वाढले असून आज शनिवारी मुंबईत 3,547 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. मुंबईत आतापर्यंत कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या ही 1 लाख 12 हजार 921 इतकी आहे. मुंबईत सध्याचा कोरोना रिकव्हर होणाऱ्या रुग्णांची संख्या ही 97 टक्के इतका आहे.

मुंबईतील कोरोना रुग्णा संख्येचा चढता आलेख देखील उतरला असला तरी सध्या अँक्टिव्ह रुग्णांची संख्या अधिक आहे. मुंबईत सध्या 12हजार 187 अँक्टिव्ह कोरोना रुग्ण आहेत. त्याचप्रमाणे 13 सक्रीय सीलबंद इमारती असून मुंबईत सध्या एकही कंटेनमेंट झोन नाही.


हेही वाचा –  India Corona Update: देशात रुग्णसंख्येत घट, तर मृत्यूमध्ये वाढ; २४ तासांत २,३५,५३२ नव्या रुग्णांची भर; ८७१ जणांचा मृत्यू