घरCORONA UPDATEMumbai Corona Update: मुंबईत आज १६५७ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद, तर २५७२ रुग्ण...

Mumbai Corona Update: मुंबईत आज १६५७ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद, तर २५७२ रुग्ण कोरोनामुक्त

Subscribe

मुंबईत आज नव्या रुग्णांपेक्षा कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांची संख्या अधिक असून १ हजार ६५७ नवीन रुग्ण सापडले तर २ हजार ५७२ रुग्णांनी कोरोनावर मात केली. यामुळे रुग्णांची वाढती संख्या नियंत्रणात आल्याचे दिसते. मुंबईत गेल्या २४ तासांत ६२ रुग्ण कोरोनामुळे दगावले आहेत. मुंबईचा रुग्ण बरे होण्याचे प्रमाण हे ९२ टक्क्यांवर पोहोचला आहे. तर कोरोना रुग्णांचा दुपटीचा दर १९९ दिवसांवर वर गेला आहे. मुंबईत आज कोरोनामुळे मृत पावलेल्या ६२ रुग्णांपैकी ३१ रुग्णांना काही दीर्घकालीन आजार होते. यात ३८ पुरुष आणि २४ महिला होत्या, तर ६ रुग्णांचे वय ४० वर्षांखाली होते. ३४ रुग्णांचे वय ६० वर्षावरील होते. तर उर्वरित २२ रुग्ण हे ४० ते ६० वयोगटामधील होते.

- Advertisement -

मुंबईत आत्तापर्यंत कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ही ६ लाख ८५ हजार ७०५ इतकी झाली आहे. मुंबईत कोरोना रुग्ण वाढीचा सरासरी दर हा ० .३४ टक्क्यांवर पोहचला आहे. मुंबईत आत्तापर्यंत ६ लाख ३१ हजार ९८२ रुग्ण हे कोरोनातून बरे होत घरी परतले असून एकूण कोरोनाबाधित मृतांचा आकडा हा १४ हजार १३८ वर पोहचला आहे.

मुंबईत सध्या ८५ सक्रिय कंटेनमेंट झोन आहेत. तर सक्रिय सीलबंद इमारतींचे प्रमाणही कमी झाले आहे. सध्या मुंबईत ३७७ सक्रिय सीलबंद इमारती आहेत. मुंबईत आज २ लाख ५२ हजार ५ नागरिकांच्या चाचण्या करण्यात आल्या असून आतापर्यंत ५८ लाख ५१ हजार २७९ नागरिकांचा कोरोना चाचण्या करण्यात आल्या.

- Advertisement -

२४ तासात बाधित रुग्ण – १६५७

२४ तासात बरे झालेले रुग्ण – २५७२

बरे झालेले एकूण रुग्ण – ६३१९८२

बरे झालेल्या रुग्णांचा दर – ९२%

एकूण सक्रिय रुग्ण- ३७६५६

दुप्पटीचा दर- १९९ दिवस

कोविड वाढीचा दर (७ मे -१३ मे)- ०.३४%


 

 

देशात कोरोनाचा कहर अजून सुरुच राहणार, पुन्हा उद्भवू शकते महामारी, केंद्राचा इशारा


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -