घरCORONA UPDATEMumbai Corona Update: मुंबईत सोमवारी १ हजार ७१२ नव्या रुग्णांची नोंद, ४...

Mumbai Corona Update: मुंबईत सोमवारी १ हजार ७१२ नव्या रुग्णांची नोंद, ४ जणांचा मृत्यू

Subscribe

मुंबईत सध्या १४ हजार ५८२ अँक्टिव्ह रुग्ण आहेत.

मुंबईतील कोरोना रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. मुंबईतील कोरोना अशाप्रकारे वाढत राहिल्यास राज्यातील इतर जिल्ह्याप्रमाणे मुंबईतही कर्फ्यू आणि कडक नियम लागू करावे लागतील. मुंबईत आज १ हजार ७१२ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर मुंबईत ४ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. असे असले तरी मुंबईत आज १ हजार ६३ कोरोनाबाधित रुग्ण बरे होईऊ घरी परतले आहेत. मुंबईत सध्या १४ हजार ५८२ अँक्टिव्ह रुग्ण आहेत. मुंबईत आतापर्यंत ३ लाख ४५ हजार ६५९ कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर आतापर्यंत ३ लाख १८ हजार ६४२कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. त्याचप्रमाणे मुंबईत आतापर्यंत ११ हजार ५३५ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

- Advertisement -

मुंबईचा रिकव्हरी रेट हा ९२ टक्के इतका आहे. मुंबईत ८ मार्च ते १४ मार्च पर्यंतचा विचार केला असता मुंबईतील कोरोना वाढीचा दर हा ०.४२ टक्के इतका आहे. १४ मार्च पर्यंत मुंबईत ३५ लाख ७४ हजार ५६ कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत. सध्या मुंबईत ३२ सक्रिय कंटेनमेंट झोन आहेत. तर २१७ सक्रिय सीलबंद इमारती आहेत.

- Advertisement -

मुंबईतील वाढती कोरोना रुग्णसंख्या लक्षात घेता कोरोनाला रोखण्यासाठी मुंबईतील हॉटेल्स, मॉल्स, लग्न समारंभावरील धाडसत्र आणखी वाढवण्यात येणार आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात नवी नियमावली जारी करण्यात आली आहे. हॉटेल्स, मॉल्स आणि सिनेमागृह ५० टक्के उपस्थिती करण्यात आली आहे. त्याचबरोबर राजकीय बैठका, सोशल गॅद्रिंग यासारख्या कार्यक्रमांवर बंदी घालण्यात आली आहे. लग्न समारंभासाठी केवळ ५० जणांची उपस्थिती अनिवार्य असणार आहे. त्याचप्रमाणे अंतयात्रेला केवळ २० जण उपस्थित राहू शकणार आहेत.


हेही वाचा – Maharashtra Corona Update: राज्यात सोमवारी १५ हजार ५१ नव्या रुग्णांची नोंद

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -