Friday, July 30, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर CORONA UPDATE Mumbai Corona Update: मुंबईत गेल्या २४ तासात १८ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू तर...

Mumbai Corona Update: मुंबईत गेल्या २४ तासात १८ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू तर ७३३ नव्या रुग्णांची नोंद

मुंबई पालिकाक्षेत्रात महानगरपालिका आणि राज्य सरकारच्या प्रयत्नांमुळे कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यात यश

Related Story

- Advertisement -

मुंबईत कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येमध्ये कमालीची घट झाली आहे. मुंबईतील कोरोना परिस्थिती बऱ्यापैकी आटोक्यात आणण्यासाठी प्रशासनाला यश आले आहे. मुंबईत कोरोना रुग्णांच्या प्रमाणात घट जरी झाली असली तरी कोरोनाचा प्रादुर्भाव अजूनही कायम आहे. मुंबईत गेल्या २४ तासामध्ये ७३३ कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर २४ तासात १८ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. महिनाभरापुर्वी कोरोना परिस्थिती भयावह झाली असताना सध्याची परिस्थिती मात्र चांगलीच सुधारली आहे. यामुळे ब्रेक द चेन अंतर्गत घालण्यात आलेल्या निर्बंधांमध्ये शिथिलता देण्यात आली आहे. मुंबईतील कोरोना बरा होण्याचा दर ९५ टक्क्यांवर गेला आहे.

मुंबई पालिकाक्षेत्रात महानगरपालिका आणि राज्य सरकारच्या प्रयत्नांमुळे कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यात यश आले आहे. कोरोना रुग्णांचा शोध घेण्यासाठी पालिका प्रशासनाने कोरोना चाचण्यांमध्ये वाढ केली आहे. दिवसभरात ७३३ रुग्ण आढळणे ही दिलासादायक बाब असली तरी मुंबईतील कोरोनाबाधितांच्या संख्येमध्ये दिवसेंदिवस कमी जास्त होत आहे. यामुळे अजूनही कोरोना परिस्थिती आटोक्यात आली नसल्याचे चित्र दिसते आहे.

- Advertisement -

मुंबईत आतापर्यंत ७ लाख १५ हजार ८७९ कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर ६ लाख ८२ हजार ६७८ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. मुंबईत सध्या १५ हजार ७९८ कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरु आहे. तसेच १५ हजार १६४ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मुंबईत आतापर्यंत ६५ लाख ९० हजार ३७१ कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत. यामध्ये आज २९ हजार १७४ कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत.

- Advertisement -

मुंबईतील कोरोना मुक्तीचा दर ९५ टक्क्यांवर आला आहे. मुंबईतील कोरोना रुग्ण दुप्पटीचा दर ६३३ दिवसांवर गेला आहे. मुंबईत सक्रिय कंटेनमेंट झोनची संख्या २१ दिवसांवर आला आहे. मुंबईत मृत्यू झालेल्या रुग्णांपैकी ११ रुग्णांना काही दीर्घकालीन आजार होते. १२ रुग्ण पुरुष व ६ रुग्ण महिला होते. ४ रुग्णांचे वय ४० वर्षाखाली होते. ९ रुग्णांचे वय ६० वर्षावर होते. तर उर्वरित ५ रुग्ण ४० ते ६० वर्षांमधील होते.

- Advertisement -