Mumbai Corona : मुंबईतील कोरोना रुग्णसंख्येत वाढ; गेल्या २४ तासांत १९५६ नवे रुग्ण

Mumbai Corona update 1965 new corona patient found in mumbai last 24 hrs

गेल्या काही दिवसांपासून देशातील कोरोना रुग्णसंख्येत मोठी वाढ होताना दिसतेय. यात मुंबईतील कोरोना रुग्णसंख्येचा आलेखही वाढतोय, मागील काही दिवसांपासून मुंबईतील कमी झालेली कोरोना रुग्णसंख्या आता झपाट्याने वाढू लागली आहे. मागील २४ तासांत मुंबईत कोरोनाचे १ हजार ९५६ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. गुरुवारी हीत संख्या १७०२ होती त्यामुळे कालच्या तुलनेत आज रुग्णसंख्या २५४ नी वाढली आहे. मुंबईत एकीकडे पावसाळ्यापूर्वी साथीच्या आजारांनी डोकं वर काढलं आहे. अशात कोरोना रुग्णसंख्याही पुन्हा वाढत असल्याने आरोग्य विभागासमोर नवे आव्हान उभे राहिले आहे. त्यामुळे नागरिकांनी काळजी घेण्याशिवाय दुसरा पर्याय नाही.

मुंबई महापालिकेच्या आकडेवारीनुसार, मुंबईत शुक्रवारी १९६५ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत तर ७६३ रुग्ण कोरोनामुक्त होत घरी परतले आहेत. यामुळे मुंबईची रिकव्हरी रेट ९८ टक्क्यांवर पोहचला आहे. मात्र कोरोना रुग्णांच्या दुपटीचा दर वाढल्याने चिंता व्यक्त होतेय. मुंबईत कोरोना रुग्ण दुप्पट होण्याचा दर ६४२ वर पोहोचला आहे. दरम्यान मुंबईत सध्या ९१९२ कोरोनाचे सक्रिय रुग्ण आहेत. तर आत्तापर्यंत १०४८४३८ रुग्ण बरे झाले आहेत.

ज्यात मागील २४ तासांत ३ हजार ८१ रुग्णांची नोंद झाली आहे. तर मृत्यूच्या (Death) संख्येत घट झाली आहे. राज्यात आज एकही कोरोना बाधित रुग्णाच्या मृत्यूची नोंद झालेली नाहीये. सध्या राज्यातील मृत्यूदर १.८७ टक्के इतका आहे. तर आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ८,१२,३७,५४४ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ७९,०४,७०९ (०९.७३ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.


आत्मसमर्पण केलेल्या नक्षलवादी युवकांना आयटीआयमधून प्रशिक्षण; राजेश टोपेंची मोठी घोषणा