Mumbai Corona Update: मुंबईत २ हजार ८७७ नव्या रुग्णांची नोंद, ८ जणांचा मृत्यू

आज मुंबईत २ लाख ८७७ नव्या कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली. यापूर्वी ७ ऑक्टोबर २०२० ला  २ हजार ८४८ रुग्णांची नोंद करण्यात आली होती.

Mumbai Corona Update: 545 corona cases recorded in 24 hours in Mumbai
Mumbai Corona Update : मुंबईकरांना मोठा दिलासा, २४ तासात शून्य रुग्ण मृत्यूसह ४४ कोरोनाबाधितांची नोंद

मुंबईतील कोरोना रुग्णांच्या संख्येने उद्रेक केला आहे. मुंबईतील कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येने अडीज हजारांचा टप्पा पार केला. आज मुंबईत २ लाख ८७७ नव्या कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली. यापूर्वी ७ ऑक्टोबर २०२० ला  २ हजार ८४८ रुग्णांची नोंद करण्यात आली होती. मुंबईत आज १ हजार १९३ कोरोना रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. तर मुंबईत आज ८ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सध्या मुंबईत १८ हजार ४२४ अँक्टिव्ह कोरोना रुग्ण आहेत. आतापर्यंत मुंबईत ३ लाख ५२ हजार ८३५ कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे ३ लाख  २१ हजार ९४७ जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर आतापर्यंत मुंबईत ११ हजार ५५५ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

मुंबईत रुग्ण बरे होण्याचा दर हा ९१ टक्के इतका आहे.  ११ मार्च ते १७ मार्च पर्यंत विचार केला असता कोरोना रुग्ण वाढीचा दर हा ०.५१ टक्के इतका आहे.  १७ मार्च पर्यंत मुंबईत ३६ लाख ३७ हजार ९३० कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत. सध्या मुंबईत ३४ सक्रिय कंटेनमेंट झोन आहेत. तर २६५ सक्रिय सीलबंद इमारती आहेत.

मुंबईतील वाढती रुग्णसंख्या पाहता मुंबई लॉकडाऊनच्या उंबरठ्यावर असल्याचे चित्र आहे. एका दिवसात कोरोनाचे २,८७७ रुग्ण आढळून आले आहेत. यापूर्वी ७ ऑक्टोबर २०२० ला २,८४८ एवढ्या कोरोना रुग्णांची नोंद झाली होती. त्याहीपेक्षा जास्त रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे या पद्धतीने रुग्ण संख्येचा वाढता आलेख राहिल्यास लवकरच मुंबईत पुन्हा एकदा लॉकडाऊन करावे लागणार असे दिसते.


 

हेही वाचा – Maharashtra Corona Update: राज्यात २३ हजार १७९ नवे कोरोना रुग्ण