घरताज्या घडामोडीMumbai Corona Update: मुंबईत लॉकडाऊन अटळ; दैनंदिन रुग्णसंख्या २० हजार पार

Mumbai Corona Update: मुंबईत लॉकडाऊन अटळ; दैनंदिन रुग्णसंख्या २० हजार पार

Subscribe

मुंबईतील एकट्या धारावीमध्ये आज १०७ नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. धारावीत आता एकूण कोरोनाबाधितांची संख्या ७ हजार ६२६वर पोहोचली आहे.

मुंबईत लॉकडाऊन होणार हे अटळ झाले आहेत. कारण काही दिवसांपूर्वी मुंबई महापालिकेचे आयुक्त इकबाल सिंग चहल यांनी मुंबईतील दैनंदिन रुग्णसंख्या २० हजार पार झाली तर लॉकडाऊन लागू करणार असा इशारा दिला होता. आज मुंबईतील दैनंदिन रुग्णसंख्या २० हजार पार गेली आहे. गेल्या २४ तासांत मुंबईत २० हजार १८१ नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली असून ४ जणांचा मृत्यू झाला आहे. तर २ हजार ८३७ रुग्ण रिकव्हर होऊन घरी गेले आहेत. तसेच आज मुंबईतील पॉझिटिव्हीटी रेट २९.९० टक्क्यांवर पोहोचला आहे. तर दुसऱ्याबाजूला गेल्या २४ तासांत मुंबईत ५७ नव्या ओमिक्रॉनबाधितांची नोंद झाली आहे. त्यामुळे मुंबईतील एकूण ओमिक्रॉनबाधितांची संख्या ५६५वर पोहोचली आहे.  त्यामुळे आता मुंबईत लॉकडाऊन होण्याची शक्यता वाढली आहे.

- Advertisement -

मुंबईत आज आढळलेल्या २० हजार १८१ रुग्णांपैकी १७ हजार १५४ रुग्ण लक्षणे नसलेले आहेत. तसेच आज दिवसभरात १ हजार १७० जण रुग्णालयात दाखल झाले आहेत. मुंबईतील एकूण कोरोनाबाधितांची संख्या ८ लाख ५३ हजार ८०९वर पोहोचली आहे. यापैकी आतापर्यंत १६ हजार ३८८ जणांचा मृत्यू झाला असून ७ लाख ५५ हजार ५६३ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या मुंबईत ७९ हजार २६० रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

आज दिवसभरात मुंबईत ६७ हजार ४८७ कोरोना चाचण्या झाल्या असून आतापर्यंत १ कोटी ३९ लाख ९२ हजार ९६ चाचण्या झाल्या आहेत. दरम्यान मुंबईतील एकट्या धारावीमध्ये आज १०७ नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. धारावीत आता एकूण कोरोनाबाधितांची संख्या ७ हजार ६२६वर पोहोचली आहे. मुंबईतील रिकव्हरी रेट ८८ टक्के असून रुग्ण दुप्पटीचा दर ७० दिवसांवर आला आहे. मुंबईतील इमारती सीलबंद झालेल्यांची संख्या ५०२वर पोहोचली आहे.

- Advertisement -

हेही वाचा – Mumbai Corona: मुंबई महापालिकेच्या २५९ कर्मचाऱ्यांचा कोरोनामुळे मृत्यू


 

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -