घरCORONA UPDATEMumbai Corona Update: शुक्रवारी मुंबईत ३ हजार ६२ नव्या रुग्णांची नोंद, १०...

Mumbai Corona Update: शुक्रवारी मुंबईत ३ हजार ६२ नव्या रुग्णांची नोंद, १० जणांचा मृत्यू

Subscribe

सध्या मुंबईत २० हजार १४० सक्रिय रुग्ण आहेत.

मुंबईतील कोरोना रुग्ण संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. मुंबईत आज ३ हजार ६२ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर आज मुंबईत १ हजार ३३४ कोरोना रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. त्याचप्रमाणे आज मुंबईत १० जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सध्या मुंबईत २० हजार १४० सक्रिय रुग्ण आहेत. मुंबईत आतापर्यंत ३ लाख ५५ हजार ८९७ कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर ३ लाख २३ हजार २८१ रुग्ण आतापर्यंत बरे होऊन घरी परतले आहेत. तर मुंबईत आतापर्यंत ११ हजार ५६५ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

- Advertisement -

मुंबईत कोरोना रुग्ण बरे होण्याचा दर हा ९१ टक्के इतका आहे. १२ मार्च ते १८ मार्चपर्यंतचा विचार केला असता मुंबईतील कोरोना वाढीचा दर हा ०.५६ टक्के इतका आहे. तर १८ मार्च पर्यंत एकूण ३६ लाख ६२ हजार ४७२ कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत. सध्या मुंबईत ३४ कंटेनमेंट झोन आहेत. तर ३०५ सक्रिय सीलबंद इमारती आहेत.

- Advertisement -

मुंबईसह राज्यभरात कोरोनाच्या रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होताना दिसत आहे. राज्यात आज २५ हजार ६८१ नव्या कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर ठाण्यात सध्या १६ हजार ७६५ अँक्टिव्ह रुग्ण आहेत. कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे राज्यात कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत.


हेही वाचा – Maharashtra Corona Update : राज्यात सलग दुसऱ्या दिवशी कोरोना रुग्ण २५ हजार पार 

 

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -