Tuesday, September 28, 2021
27 C
Mumbai
घर CORONA UPDATE Mumbai Corona Update: दिलासादायक! मुंबईत २४ तासांत नव्या कोरोनाबाधितांसह मृत्यूच्या संख्येत घट

Mumbai Corona Update: दिलासादायक! मुंबईत २४ तासांत नव्या कोरोनाबाधितांसह मृत्यूच्या संख्येत घट

Related Story

- Advertisement -

मुंबईत आज नव्या कोरोनाबाधितांसह मृत्यूच्या संख्येत घट झाली आहे. काल, गुरुवारी मुंबईत ३४० नव्या कोरोनाबाधितांची वाढ होऊन १३ जणांच्या मृत्यूची नोंद झाली होती. मात्र आज यात घट होऊन गेल्या २४ तासांत मुंबईत ३२३ नवे कोरोनाबाधित आढळले असून ७ जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. तर ३६६ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. त्यामुळे आता मुंबईतील एकूण कोरोनाबाधितांची संख्या ७ लाख ३४ हजार ४३५वर पोहोचली आहे. यापैकी आतापर्यंत १५ हजार ८८० जणांचा मृत्यू झाला असून ७ लाख ११ हजार ७३ जण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या मुंबईत ५ हजार ८२ सक्रिय कोरोनाबाधित रुग्ण आहेत.

- Advertisement -

आज मृत्यू झालेल्या ७ रुग्णांपैकी ५ रुग्णांना काही दीर्घकालीन आजार होते. एकूण मृत्यू झालेल्या रुग्णांमध्ये ५ रुग्ण पुरुष तर २ रुग्ण महिल्या होत्या. ४ रुग्णांचे वय ६० वर्षावर होते. उर्वरित ३ रुग्ण ४० ते ६० वयोगटामधील होते. मुंबईत आज दिवसभरात ३२ हजार २८५ कोरोना चाचण्या झाल्या असून आतापर्यंत ८१ लाख १८ हजार ४३७ नमुन्यांच्या चाचण्या झाल्या आहेत.

मुंबईतील बरे झालेल्या रुग्णांचा दर ९७ टक्के इतका आहे. २३ जुलै ते २९ जुलैपर्यंत मुंबईतील एकूण कोविड वाढीचा दर ०.०५ टक्के असून मुंबईतील दुप्पटीचा दर १ हजार ४३४ दिवस आहे. मुंबईत सध्या सक्रिय कंटेनमेंट झोन ३ आहेत, तर सक्रिय सीलबंद इमारती ५५ आहेत.


- Advertisement -

हेही वाचा – Maharashtra Corona Update: राज्यात २४ तासांत ६,६०० नव्या रुग्णांची वाढ, तर २३१ जण मृत्यूमुखी


 

- Advertisement -