Tuesday, September 28, 2021
27 C
Mumbai
घर CORONA UPDATE Mumbai Corona Update: मुंबईत २४ तासांत कोरोनाचे मृत्यू दुप्पट

Mumbai Corona Update: मुंबईत २४ तासांत कोरोनाचे मृत्यू दुप्पट

Related Story

- Advertisement -

मुंबईत आज कोरोना मृत्यूच्या संख्येत दुप्पटीने वाढ झाली आहे. काल, बुधवारी मुंबईत ६ कोरोना मृत्यूची नोंद झाली होती. मात्र आज १३ जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. गेल्या २४ तासांत ३४० नवे कोरोनाबाधित आढळले असून ४०३ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. मुंबईतील कोरोनाबाधितांची एकूण संख्या ७ लाख ३५ हजार ५०५वर पोहोचली आहे. यापैकी आतापर्यंत १५ हजार ८०८ जणांचा मृत्यू झाला असून ७ लाख १२ हजार १०० जण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या मुंबईत ५ हजार २०१ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

- Advertisement -

मुंबईत गेल्या २४ तासांत ३५ हजार ३९३ कोरोनाच्या चाचण्या झाल्या असून आतापर्यंत ८० लाख ८६ हजार १५२ नमुन्यांच्या चाचण्या पार पडल्या आहेत. आज मृत्यू झालेल्या १३ रुग्णांपैकी ११ रुग्णांना काही दीर्घकालीन आजार होते. ८ रुग्ण पुरुष आणि ५ रुग्ण महिला होत्या. १ रुग्णाचे वय ४० वर्षाखाली होते. तर ११ रुग्णांचे वय ६० वर्षावर आणि उर्वरित १ रुग्णाचे वय ४० ते ६० वयोगटामधील होते.

सध्या मुंबईतील बरे झालेल्या रुग्णांचा दर स्थिर असून ९७ टक्के आहे. २२ जुलै ते २८ जुलै २०२१ पर्यंत मुंबईतील एकून कोरोना वाढीचा दर ०.०५ टक्के एवढा असून दुप्पटीचा दर १ हजार ४०५ दिवस आहे. तसेच मुंबईतील सक्रिय कंटेनमेंट झोन ५ आहेत. तर सक्रिय सीलबंद इमारती ५४ आहेत.


- Advertisement -

हेही वाचा – India Corona Update: गेल्या २४ तासांत ४३,५०९ नव्या बाधितांची नोंद; रिकव्हरी रेट ९७.३८ टक्क्यांवर


- Advertisement -